Explosion  Dainik Gomantak
ग्लोबल

नायजेरियामधील तेल शुद्धीकरण कारखान्यात स्फोट

अपघातात 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

दक्षिण नायजेरियातील इमो राज्यातील बेकायदेशीर तेल शुद्धीकरण कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या अपघातात 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

नायजेरियन (Nigeria) अधिकाऱ्यांनी या स्फोटात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमीही झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघातापूर्वीच रिफायनरी चालक फरार
पेट्रोलियम अधिकारी ओपियो यांच्या म्हणण्यानुसार, अचानक झालेल्या स्फोटामुळे कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना परिसरात सर्वत्र जळालेले मृतदेह आढळले. बेकायदेशीर तेल शुद्धीकरण कारखान्याच्या संचालकाला सरकारने यापूर्वीच फरारी घोषित केले आहे.

नायजेरियात तेलाची चोरी वारंवार होत असते
स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसत होते. जनरल कॉलिन्स, क्षेत्राचे समुदाय नेते आणि इमो मधील तेल आणि वायू उत्पादन क्षेत्राच्या सर्वोच्च परिषदेचे अध्यक्ष, म्हणाले की, आतापर्यंत 108 मृतदेह सापडले आहेत. तेल कंपन्यांच्या मालकीच्या पाइपलाइनमधून कच्चे तेल चोरून आशे बेकायदेशीर तेल शुद्धीकरण कारखाने चालवले जातात. नायजेरियामध्ये तेल पाइपलाइन छेडछाड आणि तेल चोरीच्या वारंवार बातम्या येत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT