रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील 3 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

पुढील युद्ध पाश्चात्य देशांचे समर्थन आणि शस्त्रांच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे: झेलेन्स्की
War-torn area
War-torn area Dainik Gomantak
Published on
Updated on

आज रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. रशियाने युक्रेनच्या ओडेसा शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला. यामध्ये तीन महिन्यांच्या मुलीसह आठ जण ठार झाले, तर 18 जण जखमी झाले. हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना रशियन सैनिकांवर निशाणा साधला. (3-month-old girl killed in Russia's missile attack)

War-torn area
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला ब्रेक; जपानने उठवला प्रश्न

आम्ही आमची जमीन परत घेऊ
माध्यमांना संबोधित करताना झेलेन्स्की म्हणाले, "पुढील युद्ध पाश्चात्य देशांचे समर्थन आणि शस्त्रांच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. जर आम्हाला शस्त्रे मिळाली तर आम्ही रशियाकडून आमची जमीन परत घेऊ." यावेळी त्यांनी पाश्चात्य देशांना शस्त्र पुरवण्याची मागणी केली आहे.

अमेरिकेचे संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री युक्रेनला भेट देणार
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन युक्रेनला भेट देणार आहेत. दोघेही आज युक्रेनमध्ये दाखल होणार आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. झेलेन्स्की यांनी सांगितले की, ते रविवारी कीव येथे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन आणि परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांची भेट घेणार आहेत. मात्र तयांनी ब्लिंकेन आणि ऑस्टिनच्या दौऱ्याबद्दल अधिक तपशील शेअर केला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com