Pakistan Prime Minister Imran Khan | Imran Khan News Updates Dainik Gomantak
ग्लोबल

"पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?" पाश्चिमात्य देशांच्या संयुक्त पत्रावर इम्रान खान भडकले

पाश्चात्य देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या विनंतीवर पाकिस्तानचे पंतप्रधान (Imran Khan) रविवारी चांगलेच संतप्त झाले.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी इस्लामाबादमधील 22 पाश्चिमात्य राजदूतांना फटकारले, ज्यांनी गेल्या आठवड्यात युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानला विनंती केली होती. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाश्चात्य देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या विनंतीवर पाकिस्तानचे पंतप्रधान (Imran Khan) रविवारी चांगलेच संतप्त झाले. त्यांनी या देशांच्या राजदूतांना फटकरात विचारले की, पाकिस्तान (Pakistan) तुमचा गुलाम आहे का? (Imran Khan News Updates)

दरम्यान, युरोपियन युनियनच्या (European Union) सदस्य राष्ट्रांसह 22 राजनैतिक मिशनच्या प्रमुखांनी 1 मार्च रोजी संयुक्त पत्र जारी करुन युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेतील ठरावाला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानला आवाहन केले होते. हे पत्र राजनयिक अधिकाऱ्यांनी जाहीरपणे प्रसिद्ध केले. सहसा अशी प्रकरणे क्वचितच दिसतात.

तसेच, रविवारी एका राजकीय सभेला संबोधित करताना, पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले, "तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटते? आम्ही तुमचे गुलाम आहोत का... तुम्ही म्हणता ते आम्ही करु?"

दुसरीकडे, संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) आमसभेत मतदान पार पडले तेव्हा, पाश्चात्य देशांचा पारंपारिक मित्र असलेल्या पाकिस्तानने मतदानात भाग घेण्याचे टाळले. महासभेतील बहुतांश देशांनी रशियाच्या या निर्णयावर टीका करत युक्रेनवरील हल्ल्यांचा निषेध केला.

शिवाय, आपल्या भाषणात इम्रान खान यांनी पाश्चिमात्य देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनाही विचारले की, 'तुम्ही भारतालाही असेच पत्र लिहिले आहे का? तर भारताने देखील UNSC आणि UNGA मध्ये या विषयावरील मतदानात भाग घेतला नाही.' इम्रान पुढे म्हणाले, ''पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील नाटो आघाडीला पाठिंबा दिल्याने युक्रेनमुळे त्याचे नुकसान झाले आहे. पाकिस्तान कोणत्याही गटबाजीत गुंतलेला नाही.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT