Bilawal Bhutto Dainik Gomantak
ग्लोबल

Bilawal Bhutto: पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या वक्तव्यावर बिलावल भुट्टो ठाम; आता म्हणाले....

ऐतिहासिक वास्तव बोलल्याचे भुट्टोंचे स्पष्टीकरण

Akshay Nirmale

Bilawal Bhutto: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल-भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख गुजरातचा कसाई असे म्हटले होते. त्याचे मोठे पडसाद भारतात उमटले होते. आपल्या या वक्तव्याची भुट्टो यांनी स्वतःच पुन्हा पाठराखण केली आहे. त्यासाठी त्यांनी आता नवे कारण दिले आहे.

बिलावल भुट्टो त्यांच्या 'कसाई' विधानावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, मी मोदींवर जी टिप्पणी केली, ते शब्द माझे नसून भारतीय मुस्लिमांचे होते. भारतातील मुस्लिम जे बोलतात तेच मी बोललो,' असेही भुट्टो म्हणाले. ब्लूमबर्गच्या पत्रकाराशी संवाद साधताना बिलावल म्हणाले, “मी भारतीय पंतप्रधान मोदींबद्दल जे बोललो ते ऐतिहासिक वास्तव आहे, मी त्याच गोष्टीबद्दल बोलत होतो. मी केलेल्या टिप्पण्या माझ्या नाहीत. ते शब्द माझे नव्हते, मी मोदींसाठी 'गुजरातचा कसाई' हा शब्द शोधला नव्हता. गुजरात दंगलीनंतर भारतात फक्त मुस्लिमांनी मोदींसाठी हा शब्द वापरला.

गेल्या आठवड्यात, संयुक्त राष्ट्रात पत्रकार परिषदेत बिलावल यांनी पंतप्रधान मोदींना 'गुजरातचा कसाई' म्हटले होते. 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या 2,000 हून अधिक मुस्लिमांच्या हत्याकांडासाठी शिक्षा होण्याऐवजी मोदींना भारताचे पंतप्रधान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ओसामा बिन लादेन मेला पण गुजरातचा कसाई अजून जीवंत आहे, असे वक्तव्य भुट्टो यांनी केले होते.

त्यानंतर पाकिस्तानच्या आणखी एक मंत्री शाझिया मरी (Shazia Marri) यांनी बिलावलच्या समर्थनार्थ घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, आम्ही शांत बसण्यासाठी अणुबॉम्ब बनवलेला नाही. भारताकडून काही कारवाई झाल्यास त्याला उत्तर दिले जाईल. पाकिस्तानला कसं उत्तर द्यायचं ते माहीत आहे. एक थप्पड मारल्यावर दुसरा गाल समोर करणारा पाकिस्तान हा देश नाही. मी अनेक मंचांवर मोदी सरकारने पाठवलेल्या प्रतिनिधींशी लढले आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

Viral Video: नवी कोरी थार काही दिवसांत बंद पडली; मालकाने गाढवं बांधून, ताशा वाजवत कार शोरुमला ओढत नेली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT