अर्शद शरीफ
अर्शद शरीफ  दैनिक गोमन्तक
ग्लोबल

Kenya: इम्रान खान यांच्या निकटवर्तीय पत्रकाराची गोळ्या घालून हत्या, देशद्रोहाचा होता आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

पाकिस्तानमधील एका ज्येष्ठ पत्रकाराची केनियात (kenya) गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणांनी देशद्रोह आणि राज्यविरोधी काम केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे हा पाकिस्तानी पत्रकार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा निकटवर्तीय मानला जात होता. (Senior Pakistani Journalist Shot dead in kenya)

अर्शद शरीफ (वय 49) असे या पत्रकाराचे नाव असून, त्याने ARY टीव्हीसाठी रिपोर्टर तसेच, टीव्ही अँकर म्हणून काम केले होते. मागील काही महिन्यांपासून अर्शद शरीफ केनियामध्ये स्थलांतरित झाले होते. शरीफ यांच्या पत्नी जवेरिया सिद्दीकी यांनी सोमवारी ट्विट करत आपल्या पतीचे निधन झाल्याची माहिती दिली.

"मी आज एक मित्र, पती आणि माझा आवडता पत्रकार गमावला, पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याला केनियामध्ये गोळ्या घालण्यात आल्या," असे ट्विट जवेरिया सिद्दीकी यांनी केले आहे.

पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते असीम इफ्तिखार केनियातील पाकिस्तान उच्चायुक्तालय अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेत आहेत. अर्शद शरीफ यांनी इम्रान खान यांचे निकटवर्तीय शेहबाज गिल यांची मुलाखत घेतल्याबद्दल ऑगस्टमध्ये त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अर्शद शरीफ यांनी आपला देश सोडून केनियामध्ये आश्रय घेतला. त्याचवेळी त्यांनी आपण ARY पासून "वेगळे" झालो असल्याचे सांगितले. शरीफ यांचा जन्म 1973 मध्ये कराची येथे झाला आणि तीन दशकांपूर्वी त्यांनी पत्रकारितेला सुरूवात केली. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्या हस्ते त्यांना 2019 मध्ये 'प्राइड ऑफ परफॉर्मन्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

Goa Today's News Live: निवडणूक प्रभारी आशिष सूद यांच्याकडेच गोवा भाजपची जबाबदारी

SCROLL FOR NEXT