Pakistani Fisherman Became Millionaire Overnight Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistani Fisherman: दुर्मिळ माशाने पाकिस्तानी मच्छिमाऱ्याला बनवले 'करोडपती', रातोरात पालटले नशीब

Pakistani Fisherman Became Millionaire Overnight: 'ऊपर वाला जब भी देता है तो छप्पर फाड़ कर देता है' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच.

Manish Jadhav

Pakistani Fisherman Became Millionaire Overnight: 'ऊपर वाला जब भी देता है तो छप्पर फाड़ कर देता है' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. अशीच एक घटना पाकिस्तानातून समोर आली आहे. जिथे एक मच्छीमार रातोरात करोडपती झाला.

पाकिस्तानातील (Pakistan) या भाग्यवान मच्छिमाराला अनेक औषधी गुणधर्म असलेला दुर्मिळ मासा मिळाला, ज्याचा लिलाव केल्यानंतर हा मच्छीमार रातोरात करोडपती झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मच्छिमाराने हा एक मासा 7 कोटी रुपयांना विकला आहे.

दुर्मिळ मासळी 7 कोटींना विकली

दरम्यान, दुर्मिळ मासळीचा लिलाव करणारा मच्छीमार कराचीतील इब्राहिम हैदरी गावातील हाजी बलोचचा रहिवासी आहे. कराचीच्या अरबी समुद्रात नेहमीप्रमाणे मच्छिमारांचे पथक सोमवारी मासेमारीसाठी गेले होते. इथे 'सोवा' नावाने ओळखला जाणारा 'गोल्डन फिश' त्याच्या जाळ्यात अडकला.

'पाकिस्तान फिशरमेन फोक फोरम'मध्ये काम करणारे कराची मुबारक खान यांनी सांगितले की, सोमवारी त्यांना 'सोवा' नावाचा औषधी गुणधर्म असलेला दुर्मिळ मासा (Fish) समुद्रात सापडला. शुक्रवारी सकाळी कराची बंदरात मच्छिमारांचा लिलाव झाला. हा मासा लिलावात सुमारे 7 कोटी रुपयांना विकला गेला.

'सोवा' मासा का आहे खास?

'सोवा' मासा हा अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ माशांच्या यादीत समाविष्ट आहे. 'सोवा' माशाच्या पोटातून अनेक प्रकारचे पदार्थ बाहेर पडतात, ज्याचा उपयोग उत्कृष्ट उपचार आणि औषधी गुणधर्मासाठी केला जातो. 'सोवा' माशाचे सरासरी वजन 20 ते 40 किलो असते आणि त्याची लांबी 1.5 मीटरपर्यंत असते. पूर्व आशियाई देशांमध्ये या माशाला मोठी मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Gaonkar: राज्यपालांनी शपथ घेण्यास दिलेला नकार, हुकलेले पद ते नवीन सभापती म्हणून नेमणूक; गणेश गावकरांचा प्रवास

Ganesh Gaonkar: ‘एकावेळी एकानेच बोला’! नवनियुक्त सभापतींचे पहिल्‍याच दिवशी शिस्‍तीचे धडे; आमदारांना दिली तंबी

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

Kadamba Protest: EV बस 2 कोटीची, पगार मात्र 600 रुपये! कदंब चालक मागण्यांसाठी आक्रमक; संपाचा दिला इशारा

Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

SCROLL FOR NEXT