Anju Nasrullah Love Story Dainik Gomantak
ग्लोबल

Anju Nasrullah Love Story: 'कुठे फ्लॅट, कुठे प्लॉट...' अंजू फातिमा बनताच कंगाल पाकिस्तानात गिफ्टचा वर्षाव

Manish Jadhav

Anju Nasrullah Love Story: देशभरात सध्या सीमा हैदर आणि अंजूची प्रेमकहाणी चर्चेत आहे. सीमा प्रेमाखातर पाकिस्तान सोडून भारतात आली तर अंजू प्रेमाखातर भारत सोडून पाकिस्तानात गेली.

यातच, नसरुल्लाहसोबत लग्न केल्यानंतर अंजू आता 'फातिमा' बनली आहे. विशेष म्हणजे, त्याचा परिणामही दिसून येत आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील पत्रकार दिलीप कुमार खत्री यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये नसरुल्लाह अंजूला आधी शॉल आणि कपडे देतो, नंतर फ्लॅट आणि प्लॉटची कागदपत्रे सोपवतो.

मात्र, फ्लॅट पाकिस्तानातील (Pakistan) कोणत्या भागात आहे हे मात्र कळू शकलेले नाही. फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तिने नसरुल्लाहशी लग्नही केले आहे.

एका पाकिस्तानी पत्रकाराने ट्विटरवर शेअर केलेल्या कथित व्हिडिओमध्ये अंजू आणि नसरुल्लाह त्यांच्या मित्रांसोबत डिनर करताना दिसत आहेत.

अंजू ही अलवरची रहिवासी आहे

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात पती आणि दोन मुलांसोबत राहणारी अंजू नसरुल्लाहला भेटण्यासाठी 'वैध पाकिस्तानी व्हिसावर' पाकिस्तानात पोहोचली. यादरम्यान तिने जयपूरला जात असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते.

परंतु खैबर पख्तुनख्वामधील नसरुल्लाहसोबतचे अंजूचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते डिनरचा आनंद लुटताना दिसत आहेत.

ही घटना सीमा-सचिन प्रेमकथेच्या अगदी विरुद्ध आहे, जिथे सीमा हैदर ग्रेटर नोएडामध्ये सचिनसोबत राहण्यासाठी बेकायदेशीरपणे भारतात आली. सीमाने नेपाळमार्गे (Nepal) व्हिसाशिवाय भारतात प्रवेश केला, तर अंजूने व्हिसा घेऊन पाकिस्तानात प्रवेश केला.

काय आहे अंजू-नसरुल्लाहची प्रेमकहाणी?

अंजू 2019 मध्ये नसरुल्लाहला फेसबुकवर भेटली. ती 20 जुलै 2023 रोजी त्याला भेटण्यासाठी घरुन निघाली. यादरम्यान तिने पतीला सांगितले की, ती तिच्या मित्रांना भेटण्यासाठी जयपूरला जात आहे.

अंजूचे पती अरविंद यांनी सांगितले की, अंजूचा मला फोन आला तेव्ही तिने सांगितले की, ती लाहोरमध्ये आहे आणि काही दिवसात परत येईल. मात्र, अंजूला व्हिसा कसा मिळाला आणि ती पाकिस्तानात कशी गेली हे मला माहीत नाही, असे अरविंदने सांगितले.

तर दुसरीकडे, नसरुल्लाहने सांगितले की, व्हिसाची मुदत संपल्यानंतर अंजू 20 ऑगस्ट रोजी भारतात परतेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT