Pakistan Economy Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानला मोठा झटका, व्यापार तूट रोखण्याच्या प्रयत्नात बेरोजगारीचा भडका!

Pakistan Update: पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट अधिक गडद होत चाललं आहे. आता पुन्हा एकदा पाकिस्तानबाबत वाईट बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट अधिक गडद होत चाललं आहे. आता पुन्हा एकदा पाकिस्तानबाबत वाईट बातमी समोर आली आहे.

पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. वास्तविक, आता पाकिस्तानमध्ये बेरोजगारी वाढत आहे. आयातीवर बंदी घालून व्यापार तूट कमी करण्याच्या प्रयत्नांमुळे पाकिस्तानमध्ये बेरोजगारीचे संकट झपाट्याने वाढत आहे.

एका अहवालात ही माहिती समोर आली आहे. त्याचवेळी, वाढत्या बेरोजगारीमुळे पाकिस्तानातील (Pakistan) लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

उत्पादनात घट

डॉन या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, “कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे मोठ्या संख्येने कंपन्या उत्पादन कमी करत आहेत किंवा कामकाज बंद करत आहेत. अलीकडच्या काही महिन्यांत डझनभर कंपन्यांनी उत्पादन थांबवण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.'' अहवालात म्हटले आहे की, व्यापार संतुलन सुधारण्यासाठी कच्च्या मालाच्या आयातीवर अंकुश ठेवल्याने मोठे संकट निर्माण होत आहे.

बंद व्यवसाय

Dowlance या खाजगी कंपनीचे सर्व उत्पादन युनिट 2023 च्या सुरुवातीपासून बंद आहेत. कंपनीला मे 2022 मध्ये आयात-संबंधित समस्यांचा सामना करावा लागला. अहवालानुसार, कंपनीच्या सीईओने सांगितले की, ऑगस्ट 2022 मध्ये, केंद्रीय बँकेने गेल्या वर्षीच्या आयातीच्या तुलनेत 38 टक्के कोटा निश्चित केला होता, परंतु लाल फितीमुळे परिस्थिती आणखी बिघडली.

निर्यात प्रभावित

ते म्हणाले की, एखाद्या उपकरणाचा छोटासा भाग गहाळ झाला तर संपूर्ण निर्यात थांबते. त्यामुळे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्याचवेळी, प्रसिद्ध अर्थतज्ञ हाफिज-ए-पाशा यांच्या मते, 2022-23 च्या अखेरीस पाकिस्तानमधील बेरोजगारीचा (Unemployment) दर 10 टक्क्यांपर्यंत वाढेल. आकडेवारीनुसार, वार्षिक आधारावर फेब्रुवारीमध्ये निर्यातीतही 23 टक्क्यांनी घट झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT