Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: अँकर बातम्या सांगताना अचानक न्यूजरूम हादरली, पाकिस्तानातील व्हिडिओ होतोय व्हायरल!

पाकिस्तानमध्ये मंगळवारी 21 मार्चला रात्री 6.8 तीव्रतेच्या भूंकपाचे धक्के जाणवले आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan Earthquake Viral Video: भारतासह अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये काल (22 मार्च, मंगळवार) रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानच्या काही भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणावले आहेत.

रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.8 नोंदवण्यात आली आहे. या भूकंपात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर उपचार सुरू आहे. याचदरम्यान, पाकिस्तानमधील टीव्ही अँकरचा भूंकपा दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक टीव्ही अँकर बातम्या वाचताना दिसत आहे. पण त्याच्यामागे संपूर्ण न्यूजरूम देखील हालताना दिसत आहे. @MeghUpdates नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

नेटकरी या व्हिडिओमधील अँकरच्या संयम आणि शौर्याचे कौतुक करत असून तो व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भारताची राजधानी दिल्लीसह अफगाणिस्तानच्या अनेक भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानचा हिंदुकुश प्रदेश भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भारत, पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

भूकंपाचे धक्के इतके मोठे होते की अनेक घरे कोसळली. उंच इमारतींमधील लोक घरातून बाहेर आले आणि बराच वेळ भूकंपानंतर जाणवणाऱ्या धक्क्यांच्या भितीने बाहेरच होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT