Pakistan Train Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Train Accident: पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात, कराचीहून पेशावरला जाणारी ट्रेन रुळावरुन घसरली; 5 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Pakistan Rehman Baba Express Accident: पाकिस्तानातून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर आली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक प्रवासी ट्रेन रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

Manish Jadhav

Pakistan Rehman Baba Express Accident: पाकिस्तानातून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर आली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक प्रवासी ट्रेन रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे 5:15 वाजताच्या सुमारास घडला. कराचीहून पेशावरच्या दिशेने जाणारी 'रहमान बाबा एक्सप्रेस' मुलतान येथील शेर शाह पुलाजवळ पोहोचली असता अचानक ट्रेनचे डबे रुळावरुन खाली उतरले आणि मोठा हाहाकार उडाला.

दरम्यान, अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जीओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, जखमींना उपचारासाठी तातडीने मुलतानच्या निश्तर रुग्णालयात दाखल करण्यात आले. बचाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर 13 डबे रिकामे करण्यात आले असून एका डब्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी रोहरीजवळ कर्मचाऱ्यांनी डबा क्रमांक 9च्या नट-बोल्टची दुरुस्ती केली होती. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नसून या दुरुस्तीचा अपघाताशी थेट संबंध आहे की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.

या भीषण अपघातावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बचावकार्याला गती देण्याचे आणि जखमींना विनाविलंब वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पाकिस्तान रेल्वेकडून अधिकृत चौकशीनंतर सविस्तर माहिती दिली जाईल. पाकिस्तानमधील जर्जर आणि जीर्ण झालेल्या रेल्वे यंत्रणेमुळे येथे अपघात होणे ही एक सामान्य बाब बनली आहे. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्येही सिंध प्रांतातील नवाबशाहजवळ हजारा एक्सप्रेस रुळावरुन घसरुन 30 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mormugao Raja Shed Demolition: 'मुरगावचा राजा' शेडचे पाडकाम पूर्ण! अधिकाऱ्यांवरील हल्ल्याने हायकोर्ट संतप्त

Government Offices Relocation: म्हापशात 'बार्देश भवन'च्या कामाला वेग! 35 दिवसांत सरकारी कार्यालयांचे स्थलांतर; प्रकल्पासाठी 127 कोटींचा खर्च

Goa Assembly Women Representation: गोवा विधानसभेत महिलांचा आवाज आहे कुठे?

Goa Water Crisis: आज पाणी वाहून जातेय, उद्या थेंबासाठी वणवण! संभाव्य पाणीटंचाईवर आताच नियोजन करा

Abhishek Porel Century: "माझ्या आयुष्यात खूप काही घडलं...", जेलमधून सुटल्यानंतर पठ्ठ्यानं लगावलं शतक; अभिषेक पोरेल ढसाढसा रडला

SCROLL FOR NEXT