Pakistan Terrorist Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Terrorist Murder Case: 11 महिन्यांत भारताचे 11 शत्रू 'खल्लास', काही 'बुक ऑफ टेरर' होते तर काही मुंबईचे...

Manish Jadhav

Pakistan Terrorist Murder Case Updates 11 India’s Most Wanted Killed in 11 Month of 2023: भारताचे शत्रू स्वतःच नाहीसे होत आहेत. ताज्या घडामोडीत, पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर अक्रम खान उर्फ ​​अक्रम गाझी याला गोळ्या घालून ठार करण्यात आले.

आठवडाभरातील ही दुसरी हत्या असून, भारताचा मोस्ट वॉन्टेड मारला गेला. तर यावर्षी 11 महिन्यांत 11 दहशतवादी मारले गेले.

लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन, अल बद्र या दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करणे हा त्यांचा एकमेव उद्देश होता. त्यासाठी ते दहशतवादी अड्डे चालवत असत.

विशेष म्हणजे, सर्व दहशतवादी (Terrorist) अज्ञात मारेकऱ्यांच्या हातून मारले गेले. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला काहीच सुगावा लागला नाही. दहशतवाद्यांमध्ये काही दहशतवादी 'बुक ऑफ टेरर' नावाने प्रसिद्ध होते तर काही मुंबईचे गुन्हेगार होते.

शत्रू कधी मारले गेले ते जाणून घ्या

05 नोव्हेंबर : लष्कर कमांडर ख्वाजा शाहिदचे पीओकेमधील त्याच्या घरातून अज्ञातांनी अपहरण केले. नंतर पीओकेमधील नियंत्रण रेषेजवळ त्याचे कापलेले डोके सापडले. 2018 मध्ये जम्मू-काश्मीरमधील लष्कराच्या छावणीवर झालेल्या सुंजवान दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंडपैकी एक शाहिद होता.

10 ऑक्टोबर: 2016 मध्ये पठाणकोट एअरबेसवर हल्ला करणाऱ्या फिदायन पथकाचा मुख्य ऑपरेटर जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी शाहिद लतीफ याची पाकिस्तानातील सियालकोट येथील मशिदीत अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.

01 ऑक्टोबर : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मुफ्ती कैसर फारुख याची गुलशन-ए-ओमर मदरशात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

09 सप्टेंबर: लष्कर-ए-तैयबाचा कमांडर रियाझ अहमद याला पीओकेच्या रावळकोटमधील अल कुद्दूस मशिदीबाहेर ठार करण्यात आले. तो पीओकेमध्ये लष्कराच्या भरतीचे काम हाताळत होता.

29 सप्टेंबर : लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मौलाना झियाउर रहमान याची कराचीच्या गुलिस्तान-ए-जौहर भागात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

6 मे : पाकिस्तानातील (Pakistan) लाहोर येथे वॉन्टेड दहशतवादी आणि खलिस्तान कमांडो फोर्सचे प्रमुख परमजीत सिंग पंजवार याची अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्याच राहत्या घराजवळ हत्या केली. तो अमली पदार्थांच्या तस्करीतही सक्रिय होता.

4 मार्च : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे दहशतवादी सय्यद नूर शालोबर याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. तो पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या संगनमताने काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करत असे.

26 फेब्रुवारी : पाकिस्तानातील अल बद्रचा माजी कमांडर सय्यद खालिद रझा याची कराचीमध्ये त्याच्याच घराबाहेर अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. अल बद्र ही कट्टरतावादी संघटना आहे. त्यातून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी आणि घटना घडतात.

22 फेब्रुवारी : अफगाणिस्तानातील काबुलमध्ये इजाज अहमद अहंगर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भारतात इस्लामिक स्टेट पुन्हा सुरु करण्यासाठी इजाज अल कायदाच्या संपर्कात होता.

20 फेब्रुवारी : हिजबुल मुजाहिद्दीनचा लॉन्चिंग कमांडर बशीर अहमद पीर उर्फ ​​इम्तियाज आलम याची रावळपिंडीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तो जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील रहिवासी होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT