Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Taliban Tension: आत्मघातकी हल्ल्यावरुन तालिबानवर भडकला पाकिस्तान, चीनची चुप्पी; 5 चिनी नागरिक मारले

Manish Jadhav

Pakistan Taliban Tension: पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. 26 मार्च रोजी झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा कट अफगाणिस्तानात रचल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतात आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंत्यांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणातील पाकिस्तानच्या तपासात असे समोर आले की, या आत्मघाती हल्ल्याचा कट अफगाणिस्तानात रचण्यात आला होता. दुसरीकडे, आपल्या नागरिकांच्या मृत्यूमुळे आधीच संतप्त झालेल्या चीनने पाकिस्तानच्या तपासाचे कौतुक केले परंतु तालिबानला जबाबदार धरुन वक्तव्य करण्याचे टाळले.

दरम्यान, पाकिस्तानने (Pakistan) अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारवर आरोप केला की, एकीकडे आपण जगातील सर्व देशांची पर्वा न करता आपल्या शेजारी देशामध्ये राजदूत पाठवून संबंध सुधारण्याचा पाया घातला, तर दुसरीकडे मात्र तालिबान सरकारने आपला विश्वासघात केला. पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात अनेक लोक मारले गेले. या संपूर्ण घटनेचा कट अफगाणिस्तानात रचल्याचे तपासादरम्यान समोर आले. आम्ही मध्यंतरी तालिबान सरकारला कट रचणाऱ्यांना आमच्या ताब्यात देण्याचे आणि तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले, परंतु त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

चीनचा पाकिस्तानला पाठिंबा

दुसरीकडे, 26 मार्च रोजी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पाच चिनी अभियंत्यांवर पाकिस्तानने केलेल्या कारवाईचे चीनने कौतुक केले. बीजिंग सरकारने पाकिस्तानला या हल्ल्याच्या तपासासाठी संपूर्ण पाठिंबा दिला होता. चीनच्या (China) परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, "दहशतवादी हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानी बाजूने केलेल्या महत्त्वपूर्ण तपासाचे चीन कौतुक करतो." चीनने संबंधित देशांना दहशतवादविरोधी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर सर्व दहशतवादी संघटनांचे समूळ उच्चाटन करण्याचे आणि सर्व देशांच्या समान सुरक्षा आणि विकासाच्या हितांचे रक्षण करण्याचे आवाहन केले.

तालिबानवर पाकिस्तान चिडला

यापूर्वी, पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी आत्मघातकी हल्लेखोर अफगाणिस्तानचा नागरिक असल्याचा दावा केला होता. लाहोरमधील पत्रकार परिषदेत गृहमंत्री मोहसिन नक्वी म्हणाले की, ‘’या हल्ल्यासाठी कट अफगाणिस्तानात रचण्यात आला. विशेषत: पाकिस्तानमधील चिनी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी हा कट रचण्यात आला.’’ यासाठी त्यांनी बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला (टीटीपी) जबाबदार धरले. दुसरीकडे मात्र, पाकिस्तानच्या आरोपांमुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण झाला आहे.

याशिवाय, पाकिस्तान तालिबानला अफगाणिस्तानातील टीटीपीवर कारवाई करण्यासाठी सतत आग्रह करत आहे. दुसरीकडे, काबूलने पाकिस्तानचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानने कट रचणाऱ्यांना ताब्यात देण्याच्या विनंतीला दोन दिवस उलटूनही तालिबानने प्रतिसाद दिलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT