Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: डॉक्टरांनी शस्त्रक्रिया थांबविल्या, पाकिस्तानची आरोग्य व्यवस्था 'व्हेंटिलेटरवर'

पाकिस्तानमधील आर्थिक संकटाचा तेथील आरोग्य व्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे.

Pramod Yadav

पाकिस्तानमधील आर्थिक संकटाचा तेथील आरोग्य व्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. अत्यावश्यक औषधांसाठी येथील रुग्णांची अडचण होत आहे. देशातील परकीय चलनाचा साठा कमी झाला असून, त्याचा देशांतर्गत उत्पादनात वापरल्या जाणार्‍या आवश्यक औषधे किंवा सक्रिय फार्मास्युटिकल घटक (एपीआय) आयातीवर परिणाम झाला आहे. यामुळे स्थानिक औषध उत्पादकांना त्यांचे उत्पादन कमी करावे लागले. औषधे व वैद्यकीय उपकरणांच्या कमतरतेमुळे डॉक्टरांना शस्त्रक्रिया देखील करता येत नाहीये.

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, ऑपरेशन थिएटरमध्ये हृदय, कर्करोग आणि किडनीसह संवेदनशील शस्त्रक्रियांसाठी आवश्यक असलेल्या भूल देण्याचा साठा दोन आठवड्यांपेक्षा कमी आहे. रुग्णालयांतील लोकांच्या नोकऱ्याही जाऊ शकतात, ज्यामुळे नागरिकांच्या दुःखात आणखी वाढ होऊ शकते. औषध उत्पादकांनी आरोग्य व्यवस्थेतील संकटासाठी आर्थिक व्यवस्थेला जबाबदार धरले आहे.

पाकिस्तानातील औषध उत्पादन मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे. पाकिस्तानातील सुमारे 95 टक्के औषधांना भारत आणि चीनसह इतर देशांकडून कच्चा माल लागतो. बँकिंग व्यवस्थेत डॉलर्स नसल्याने कराची बंदरात बहुतांश औषध उत्पादकांसाठी आयात साहित्य थांबवण्यात आले आहे. वाढत्या इंधन खर्च आणि वाहतूक शुल्क आणि पाकिस्तानी रुपयाचे तीव्र अवमूल्यन यामुळे औषध निर्मितीचा खर्च सातत्याने वाढत असल्याचे औषध उत्पादन उद्योगाने म्हटले आहे.

पाकिस्तान मेडिकल असोसिएशनने (पीएमए) परिस्थितीला हातळण्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली. मात्र, तात्काळ पावले उचलण्याऐवजी अधिकारी तुटवड्याचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पाकीस्तानमध्ये सध्या Panadol, Insulin, Brufen, Disprin, Calpol, Tegral, Nimesulide, Hepamerz, Buscopan आणि Rivotril महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा आहे. पाकिस्तानच्या सरकारी सर्वेक्षण पथकांनी पंजाब भागात भेट दिली. यावेळी ही गोष्ट आढळून आली.

"सध्याची धोरणे (आयात बंदी) पुढील चार ते पाच आठवडे कायम राहिल्यास, देशाला सर्वात वाईट औषध संकटाचा सामना करावा लागेल." असे पाकिस्तान फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (PPMA) चे केंद्रीय अध्यक्ष सय्यद फारूख बुखारी म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT