पाकिस्तानची पहिली ट्रान्सजेंडर टीव्ही न्यूज अँकर मारविया मलिक हिच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. मारविया या हल्ल्यातून थोडक्यात बचावली आहे. लाहोरमध्ये गुरुवारी (23 फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली.
26 वर्षीय मारविया मलिक ही पाकिस्तानची पहिली ट्रान्सजेंडर टीव्ही न्यूज अँकर आहे. मारविया देशातील ट्रान्सजेंडर लोकांसाठी आवाज उठवते, ज्याला अनेक लोक विरोध करतात.
टीव्ही न्यूज अँकर मारविया सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ लाहोरच्या बाहेर गेली होती. मारविया शस्त्रक्रियेसाठी बाहेर गेली होती आणि काही वेळापूर्वी लाहोरला परतली होती. इस्लामिक देश पाकिस्तानमध्ये प्रथमच, मारविया मलिकने ट्रान्सजेंडर न्यूज अँकर म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली.
पाकिस्तानमधील कोहिनूर न्यूजसाठी ती टीव्हीची अँकर आहे. ट्रान्सजेंडर समुदायासाठी आवाज उठवल्याबद्दल तिला अनेक दिवसांपासून धमक्या येत होत्या आणि त्यामुळेच तिच्यावर हल्ला झाला असल्याची शक्यता आहे. असे मारविया मलिकने पोलिसांना सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी ती रुग्णालयातून घरी येत असताना बंदुकधारींनी तिच्यावर हल्ला केला. 2018 मध्ये मलिक पाकिस्तानची पहिली ट्रान्सजेंडर न्यूज अँकर बनली होती. हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नसल्याचंही तिने अनेकवेळा सांगितलं होतं. अँकर होण्यापूर्वी, ती एक ट्रान्सजेंडर मॉडेल होती आणि ती देखील पाकिस्तान फॅशन डिझाइनद्वारे आयोजित एका मोठ्या फॅशन शोसाठी.
इतर ट्रान्स लोकांप्रमाणे कुटुंबाकडून पाठिंबा मिळत नसल्याचे तिने सांगितले. स्वतःहून छोटी-मोठी नोकरी करून शिक्षण पूर्ण केले. तिला न्यूज अँकर व्हायचे होते आणि तिला संधी मिळाली आणि तिने संधीचे सोने केले. संधी मिळाल्यास आपल्या समाजातील लोकही खूप काही करू शकतात, असे ती म्हणते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.