Pakistan refuse India demands to help Afghanistan Dainik Gomanatak
ग्लोबल

पाकिस्तानचा भारताबद्दल द्वेषचं! अफगाणिस्तानच्या मदतीचा हा प्रस्ताव फेटाळला

पाकिस्तानने भारताचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानने (Pakistan) भारताबाबतचा (India)आपला द्वेष कमी करत नाही हे आता साऱ्या जागानं पाहिलं,त्यातच पाकिस्तानने आता भारताचा आणखी एक प्रस्ताव फेटाळला आहे. वास्तविक, पाकिस्तानच्या वाघा सीमेवरून भारतीय किंवा अफगाण ट्रकद्वारे 50,000 टन गहू अफगाणिस्तानला (Afghanistan) पाठवण्याचा भारताकडून प्रस्ताव होता, जो पाकिस्तानने पूर्णपणे फेटाळला आहे.(Pakistan refuse India demands to help Afghanistan)

पाकिस्तानने भारताचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. मानवतावादी हेतूंसाठी अपवाद म्हणून पाकिस्तानने गेल्या आठवड्यात भारताला गहू आणि जीवरक्षक औषधे शेजारच्या अफगाणिस्तानात नेण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाची अधिकृतपणे माहिती दिली होती.अफगाणिस्तानात गहू वाहतूक करण्यासाठी नवी दिल्ली अव्यवहार्य पर्याय सुचवत असल्याचा आरोप येथील अधिकृत सूत्रांनी केला आहे. पाकिस्तानच्या माध्यमातून अफगाणिस्तानला मदत देण्याच्या पद्धती निश्चित करण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा सुरू असल्याचे भारताने गुरुवारी सांगितले आहे मात्र मानवतावादी मदत वितरणावर कोणतीही अट नसावी यावर देखील भारताने भर दिला.

नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, मानवतावादी सहकार्यासाठी कोणतीही अट असू नये. या प्रकरणाशी परिचित असलेल्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान आग्रही आहे की अफगाणिस्तानात पाठवल्या जाणार्‍या गहू आणि औषधांची खेप वाघा सीमेवरून पाकिस्तानी ट्रकमध्ये पाठवली जावी, तर भारत स्वतःचे ट्रक वापरण्यासाठी आग्रही आहे.

तर दुसरकिडे एका स्थ्यनिक वृत्तपत्राने पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने , पाकिस्तानी पद्धतींना अटी म्हणून पाहिले जाऊ नये. ते म्हणाले की,या अटी अफगाणिस्तानला भारताच्या मानवतावादी मदतीसाठीच आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT