Pakistan Prime Minister Imran Khan statement on Jammu-Kashmir after INDvsPak match Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानच्या विजयानंतर इम्रान खान बरळले

रियाधमध्ये पाकिस्तान-सौदी इन्व्हेस्टमेंट फोरमला संबोधित करताना इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आवळला आहे.

दैनिक गोमन्तक

T-20 मध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानच्या (INDvsPak) पहिल्या विजयाच्या आनंदात पाकिस्तानच्या (Pakistan) गृहमंत्र्यांनी अजब विधान केल्यांनतर पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) हेही बरळले आहेत. भारतासोबतचे संबंध सुधारण्याच्या गरजेचा संदर्भ देत इम्रान म्हणाले की, टी-20 विश्वचषकात (T-20WorldCup) भारताविरुद्ध आपल्या देश विजयी झाला आहे त्यामुळे भारतासोबत चर्चेसाठी ही योग्य वेळ नाही.असे अजब विधान पाकिस्तानी पंतप्रधानांनी केले आहे. (Pakistan Prime Minister Imran Khan statement on Jammu-Kashmir after INDvsPak match)

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सौदी अरेबियात पोहोचलेले इम्रान खान म्हणाले, 'आमचे चीनशी चांगले संबंध आहेत, परंतु जर आपण भारताबरोबरचे संबंध सुधारले तर - मला माहित आहे की काल रात्री क्रिकेट सामन्यात पाकिस्तान संघाने पराभूत केल्यानंतर, भारतासोबतचे संबंध सुधारण्यावर बोलण्यासाठी ही चांगली वेळ नाही.'

रियाधमध्ये पाकिस्तान-सौदी इन्व्हेस्टमेंट फोरमला संबोधित करताना इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आवळला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये एकच मुद्दा आहे, तो म्हणजे 'काश्मीर'. आणि हा मुद्दा सुसंस्कृत शेजाऱ्यांप्रमाणे सोडवावा , असे आवाहनही त्यांनी भारताला केले आहे.त्याचबरोबर ते म्हणाले की, 72 वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने काश्मीरमधील लोकांना आत्मनिर्णयाचा अधिकार दिला होता. तसाच अधिकार लोकांना आता मिळाले तर अम्हाला कोणतीही अडचण नाही. दोन्ही देश सुसंस्कृत शेजाऱ्यांप्रमाणे राहू शकतात.

त्याचबरोबर इम्रान खान म्हणाले की, भारत पाकिस्तानमार्गेच मध्य आशियापर्यंत पोहोचेल आणि त्या बदल्यात पाकिस्तानला देखील दोन मोठ्या बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळेल. ते म्हणाले, 'मी सौदीच्या व्यावसायिक समुदायाला हेच समजावून सांगू इच्छितो की परिस्थिती नेहमीच सारखी नसते.ती नेहमी बदलत असते.

दुसरीकडे जम्मू-काश्मीरबाबत भारताचा संदेश स्पष्ट आहे. काश्मीर हा आपला अंतर्गत विषय असल्याचे भारताचे म्हणणे आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत राहील तोपर्यंत त्याच्याशी चर्चा होऊ शकत नाही.असे स्पष्ट मत भारताने मांडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT