Pakistan Electricity Cut Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानमध्ये 18-18 तास बत्ती गुल, उद्योगांना फटका

केवळ भारतच नाही तर शेजारील पाकिस्तानलाही सध्या वीज संकटाचा सामना करावा लागत आहे.

दैनिक गोमन्तक

इस्लामाबाद: केवळ भारतच नाही तर शेजारील पाकिस्तानलाही (Pakistan) सध्या वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. तिथली परिस्थिती भारतापेक्षा वाईट आहे. शहरी भागात दररोज 6 ते 10 तासांची वीज कपात केली जाते. त्याचबरोबर ग्रामीण भागात 18-18 तास विजेसाठी (Electricity) जनता आसुसलेली आहे. पॉवर प्लांटमधील उत्पादनात कमालीची घट झाली आहे. युक्रेन युद्ध (Ukraine War) आणि इतर कारणांमुळे अनेक प्लांट्सना मोठ्या प्रमाणात इंधन संकटाचा सामना करावा लागत आहे. (Pakistan Electricity Cut)

पाकिस्तानची मोठी मीडिया संस्था डॉनने वीज विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, सध्या देशात 7 ते 8 हजार मेगावॅट विजेचा तुटवडा आहे. अशीच उष्णता कायम राहिल्यास विजेचे संकट आणखी वाढू शकते. राजधानी इस्लामाबाद आणि रावळपिंडीसारख्या मोठ्या शहरांमध्येही तासनतास वीजपुरवठा (Pakistan power crisis) खंडित होत आहे. रमजान महिन्यातही लोकांना दिलासा नाही. वीज न मिळाल्याने छोटे-मोठे सर्वच उद्योग धोक्यात आले आहेत. वृत्तसंस्था एएनआयने स्थानिक मीडियाच्या हवाल्याने सांगितले की, खैबर पख्तुनख्वामधील अनेक भागात दररोज 15 तास वीज कापली जात आहे. कराची, सिंध आणि बलुचिस्तानमधील वीज संकटानेही लोकांना घाम फोडला आहे.

मात्र, ईद-उल-फित्रनंतर परिस्थिती सुधारेल, अशी आशा कराची इलेक्ट्रिक सप्लाई कंपनीच्या प्रवक्त्याने व्यक्त केली. त्याचप्रमाणे इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीनेही सांगितले की ते संकट लवकरच सोडवतील आणि वीज निर्मिती पूर्वीप्रमाणेच सुरू होईल. पण लोकांना वाटते की ही केवळ हवाई आश्वासने आहेत. प्रत्यक्षात परिस्थिती सुधारण्याची शक्यता खूपच कमी आहे.

पाकिस्तानातील सर्व वीज प्रकल्प ठप्प झाले आहेत. फर्स्टपोस्टच्या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये 35,000 मेगावॅट वीज निर्माण करण्याची क्षमता आहे. यामध्ये जलविद्युत प्रकल्पातून एक हजार मेगावॅट, खासगी प्रकल्पातून 12 हजार मेगावॅट आणि औष्णिक प्रकल्पातून 2500 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. 15 एप्रिल रोजी ऊर्जा मंत्रालयाने नवीन पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना कळवले होते की 3500 मेगावॅट पेक्षा जास्त वीज निर्मिती करणारे 9 मोठे पॉवर प्लांट इंधनाच्या कमतरतेमुळे ठप्प झाले आहेत. एलएनजीच्या कमतरतेमुळे 4 प्लांट बंद आहेत. 2 मध्ये फर्नेस ऑइलचा तुटवडा आहे. एक तर कोळशाचा साठा संपला आहे. उर्वरित एका प्लांटला कराराची मुदत संपल्याने गॅस मिळत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT