Pakistan PM Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानचे PM इम्रान खान यांनी मुस्लिम देशांबाबत व्यक्त केली नाराजी

इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (OIC) 48 व्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या (सीएफएम) उद्घाटन सत्रामध्ये ते बोलत होते.

दैनिक गोमन्तक

इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी इस्लामाबाद येथील संसद भवनात इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (OIC) 48 व्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या (सीएफएम) उद्घाटन सत्रामध्ये बोलताना पुन्हा एकदा काश्मीर बद्दल संताप व्यक्त केला. तसेच मुस्लिमांवर नाराजी व्यक्त केली. (Pakistan PM Imran Khan expresses displeasure over Muslim countries)

इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी मुस्लिम देशांच्या संघटनेला सांगितले की, भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा (अनुच्छेद 370) रद्द केल्याने हे दिसून येते की, आम्ही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणू शकलो नाही.

मुस्लीम जगताने एकत्र राहण्याची आणि समान अजेंड्यावर एक गट म्हणून राहण्याची नितांत गरज असल्याबद्दल बोलताना ते म्हणाले की जगभरात मुस्लिमांची हत्या केली जात आहे आणि दहशतवादाशी चुकीचा संबंध जोडला जात आहे. इम्रान खान यांच्याबरोबरच सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनीही काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.

पॅलेस्टाईन आणि काश्मीरच्या (Kashmir) मुद्द्यावर बोलताना खान म्हणाले की, त्या भागात दिवसाढवळ्या लूट केली जात आहे तर मुस्लिम जग हे मूकेपणे पाहत आहे. ते पुढे म्हणाले, “भारत जम्मू आणि काश्मीर राज्याची लोकसंख्या मुस्लिम बहुसंख्य राज्यातून मुस्लिम अल्पसंख्याक राज्यात बदलत आहे. याचा भारताला (India) काही फरक पडत नाही, कारण मुस्लिम जग त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी काहीही करत नाही. सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनीही ओआयसी देशांना संबोधित करताना पॅलेस्टाईन आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. काश्मीरचा संदर्भ देत त्यांनी या प्रकरणावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची विनंती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT