Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Politics: आता इम्रान खान नव्या लष्करप्रमुखांवर संतापले, बोलले 'ही' मोठी गोष्ट

Pakistan News: आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निशाण्यावर नवे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीरही आले आहेत.

दैनिक गोमन्तक

Pakistan Politics: पाकिस्तानमध्ये आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकट देखील अधिक गडद होत चाललं आहे. यातच आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निशाण्यावर नवे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीरही आले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून इम्रान खान (Imran Khan) माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यावर टीका करत आहेत, मात्र आता ते नव्या लष्करप्रमुखांवरही नाराज असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, इम्रान रविवारी म्हणाले की, 'हे पाकिस्तानचे दुर्दैव आहे की, आमचे लष्कर आणि त्यांचे प्रमुख इतिहासातून कोणताही धडा घेऊ शकले नाहीत. ते अजूनही राजकारणात (Politics) ढवळाढवळ करत आहे.' तसेच, मुनीर जेव्हा लष्करप्रमुख झाले तेव्हा खान यांनी सुरुवातीला त्यांची खूप प्रशंसा केली, पण अचानक आता ते मुनीर यांच्यावरही निशाणा साधताना दिसत आहेत.

तसेच, खान यांनी पुन्हा एकदा देशात लवकरात लवकर निवडणुका (Election) घेण्याची मागणी केली आहे. खान म्हणाले की, 'पाकिस्तानच्या समस्यांवर एकच उपाय आहे. लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात आणि त्यात कोणतीही हेराफेरी होता कामा नये.'

'सेना अजूनही राजकारणात हस्तक्षेप करत आहे'

पीटीआयचे प्रमुख खान यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या पक्षाच्या महिला विंगला संबोधित करताना सांगितले की, 'पाकिस्तानचे दुर्दैव आहे की, आमच्या लष्कराने इतिहासात केलेल्या जुन्या चुकांमधून अद्याप धडा घेतलेला नाही. ते अजूनही राजकारणात ढवळाढवळ करत आहे. ते एका बाजूने भांडण लावत आहेत. सेना वेगळा खेळ खेळत आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये माझ्या पक्षाचे सरकार आहे आणि तेथेही राजकीय खेळ सुरु आहेत. त्यांना काय करायचे आहे ते समजत नाही.'

'देशात पॉलिटिकल इंजिनिअरिंग केली जात आहे'

इम्रान पुढे म्हणाले की, 'पाकिस्तानमध्ये अजूनही पॉलिटिकल इंजिनिअरिंग केली जात आहे. आज सरकार खूप कमकुवत आहे. अशा परिस्थितीत देशाला संकटातून कोण बाहेर काढणार? आता कोणतेही सरकार आले तरी त्याला पाच वर्षे पूर्ण झाली पाहिजेत आणि या सरकारला कठोर निर्णय घेण्यापासून रोखू नये. आम्हाला मतांच्या माध्यमातून क्रांती हवी आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: कारमध्ये कोंडले, लाथाबुक्यांनी केली मारहाण; तक्रारदाराची साक्ष देण्यास नकार; खंडणी प्रकरणातील 6 आरोपी निर्दोष

Goa Live News: सत्तारीतील भुईपाल येथे अपहरणाचा प्रयत्न

Goa Politics: '60 वर्षे गोव्यावर ठराविक कुटुंबांचीच पकड! फॅमिलीराज संपवणे गरजेचे'; केजरीवालांनी घेतले भाजप, काँग्रेसवर तोंडसुख

Goa Politics: खरी कुजबुज; तरीही केजरीवालांचे ‘एकला चलो’ का?

Goa: RSSच्या विजयादशमीला मोन्‍सेरात उपस्‍थित! 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले अभिनंदन; उत्पल पर्रीकरांची गणवेशात उपस्‍थिती

SCROLL FOR NEXT