Prophet Muhammad Dainik Gomantak
ग्लोबल

पैगंबर विवाद: भारताविरोधात पाकिस्तान चालवतोय सोशल मीडियावर 'नापाक' मोहिम

पाकिस्तान पुन्हा एकदा भारताची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहे.

दैनिक गोमन्तक

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी चर्चेदरम्यान मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्यावर टीका केल्यानंतर पाकिस्तान पुन्हा एकदा भारताची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहे. डिजिटल फॉरेन्सिक रिसर्च अँड अॅनालिटिक्स सेंटर (DFRAC) ने ही माहिती दिली. (Pakistan is once again using social media to discredit India)

60,000 हून अधिक ट्विटर वापरकर्त्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यापैकी बहुतेक नॉन-व्हेरिफाईड वापरकर्ते होते ज्यांनी भारताविरुद्ध भडकाव्याचे हॅशटॅग वापरण्याचा प्रयत्न केला. विविध देशांतील 60,020 वापरकर्त्यांनी या मुद्द्यावर पाकिस्तानच्या 7,100 हून अधिक हँडल्सशी संवाद साधला आहे.

पाकिस्तानातील डिजिटल माध्यम वापरकर्त्यांच्या मनात अनेक प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सुरू आहेत आणि त्यामुळेच दिशाभूल करणारी अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केली जात आहेत.

DFRAC च्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी आर्य न्यूजसह अनेक मीडिया हाऊसने ओमानच्या ग्रॅंड मुफ्तींनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकल्याची खोटी बातमी चालवली होती. त्यांनी पैगंबर मुहम्मद यांच्यावरील वक्तव्यावर टीका केली आणि सर्व मुस्लिमांना त्याविरोधात एकत्र येण्याचे आवाहन देखील केले. परंतु, भारताचा बहिष्कार करणारा हा ट्रेंड दिशाभूल करणारा आहे.

त्याचप्रमाणे पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल यांनी भाजपचे निष्कासित नेते नवीन जिंदाल हे बिझनेसमॅन जिंदाल यांचे भाऊ असल्याचा चुकीचा दावा देखील केला होता. याशिवाय इंग्लिश क्रिकेटर मोईन अलीच्या नावाने एक बनावट स्क्रीनशॉट वापरण्यात आला होता ज्यामध्ये तो आयपीएलवर बहिष्कार घालण्याबाबत बोलत असल्याचे त्यामधून दिसून येत होते. आणि तो स्क्रीनशॉट व्हायरलही झाला. #Stopinsulting_ProphetMuhammad, #boycottindianproduct हे काही सर्वाधिक वापरलेले हॅशटॅग होते.

इंडोनेशिया, सौदी अरेबिया, यूएई, जॉर्डन, बहरीन, मालदीव, ओमान, अफगाणिस्तान, कुवेत, कतार आणि इराणसह अनेक देशांनी शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. इराण आणि कतारने भाजपच्या दोन्ही नेत्यांविरोधात भारत सरकारने केलेल्या कारवाईवर समाधानी असल्याचे वक्तव्य जारी केले.

खालिद बेदुइन, मोइनुद्दीन इब्न नसरुल्ला आणि अली सोहराब यांसारख्या द्वेष करणाऱ्यांना जातीयवाद पसरवण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. खालिद बेदौनने #BoycottIndianProduct या हॅशटॅगसह पोस्ट करण्यास सुरुवात केली आणि त्यादरम्यान काश्मीरचा मुद्दा देखील त्यामध्ये ओढला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT