Pakistan Train Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Train Accident: पाकिस्तानात मोठा रेल्वे अपघात, हजारा एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 15 जणांचा मृत्यू; 50 जखमी

Pakistan: पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ट्रेनमध्ये मोठ्या संख्येने लोक प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन कराचीहून पंजाबकडे जात असताना अपघात झाला.

Manish Jadhav

Pakistan Train Accident: पाकिस्तानातील शहजादपूर आणि नवाबशाह दरम्यान सहारा रेल्वे स्थानकाजवळ रविवारी रावळपिंडीहून जाणाऱ्या हजारा एक्स्प्रेसच्या 10 बोगी उलटल्याने 50 जण जखमी झाले. बचाव कार्यात 22 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. बचावकार्य सुरु आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ट्रेनमध्ये मोठ्या संख्येने लोक प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन कराचीहून पंजाबकडे जात असताना अपघात झाला.

दरम्यान, कराचीहून (Karachi) रावळपिंडीला जात असताना हजारा एक्स्प्रेस रविवारी शहजादपूर आणि नवाबशाह दरम्यान रुळावरुन घसरली, असे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले. संघारचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50 जण जखमी झाले आहेत.

अपघातात जखमी झालेल्यांना नवाबशहा येथील पीपल्स मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

दुसरीकडे, अधिकाऱ्यांनी सांगितले की ट्रेन रुळावरुन घसरण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वेचे विभागीय अधीक्षक महमुदूर रहमान म्हणाले की, सध्या अपडेट प्राप्त होत आहेत.

प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सध्या बचावकार्य सुरु असल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर जवळच्या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती लागू करण्यात आली आहे. डीएस यांनी पुष्टी केली की, “प्रारंभिक माहितीनुसार, 7 ते 8 डबे रुळावरुन घसरले. मात्र ही संख्या आणखी वाढू शकते.''

रेहमान म्हणाले की, मदतकार्य करण्यासाठी लोको शेड रोहरी येथून एक ट्रेन घटनास्थळी पोहोचत आहे. अपघातामुळे अप ट्रॅकवरील वाहतूक बंद आहे, असे त्यांनी जिओ न्यूजला सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

SCROLL FOR NEXT