Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

खबरदार! 'पाकिस्तान झिंदाबादची रिंग टोन नसेल तर'... इम्रान सरकारचा नवा प्रताप

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानमध्ये (Pakistan) गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. खैबर पख्तुख्वा प्रांतात ही घटना घडली आहे. येथे इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ ( PTI) चे सरकार आहे. हा हल्ला तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (TTP) केला असल्याचे सांगण्यात येत आहे. टीटीपीद्वारा एका महिन्यातील हा 7 वा हल्ला आहे.

दुसरीकडे, बलुचिस्तानमधील (Balochistan) सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश जारी करण्यात आला आहे. त्या आदेशात म्हटले आहे की, त्यांना त्यांच्या मोबाईलच्या रिंगटोनमध्ये 'पाकिस्तान जिंदाबाद' ठेवणे आवश्यक असणार आहे.

लष्करी ऑपरेशन

पाकिस्तानी लष्कराने (Pakistan Army) गुरुवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मारलेल्या कॅप्टनचे नाव सिकंदर आहे. 27 वर्षीय सिकंदर त्याच्या युनिटकडून गुप्त माहिती मिळाल्यानंतर लष्करी कारवाई करण्यासाठी गेला. या दरम्यान पाकिस्तान तालिबानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. लष्करी कारवाई दरम्यान सिकंदर दहशतवाद्यांच्या गोळ्यांचे लक्ष्य बनला. चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला आहे.

अफगाणिस्तानचा प्रभाव

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानच्या राजवटीनंतर त्याचा स्पष्ट परिणाम पाकिस्तानमध्ये दिसून येत आहे. पाकिस्तानमध्ये तालिबानचा वरदहस्त अधिक असून तो सतत पाकिस्तानी लष्करावर हल्ला करत आहेत. टीटीपीने धमकी दिली आहे की, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला किंवा कंपनीला या भागात काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

पाकिस्तान सरकार टीटीपीला पाकिस्तानमध्ये हल्ले करण्यापासून रोखण्यासाठी अफगाण तालिबानचे आपल्या कलाने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी दुसरीकडे अफगाण तालिबानने म्हटले आहे की, ही पाकिस्तानची अंतर्गत बाब असून टीटीपीच्या बाबतीत आम्ही हस्तक्षेप करणार नाही.

इराण सीमेवर तणाव

पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया शाखेने असेही सांगितले आहे की, बलुचिस्तानच्या सीमेवर इराण (Iran) तणाव वाढत आहे. गुरुवारी येथे पाकिस्तानी सैन्याचा एक सुभेदार दर्जाचा अधिकारी ठार झाला. बलुचिस्तानच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तान अनेकदा बलुचिस्तानमधून दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप इराणवर करतो.

आता रिंग टोन ठेवण्याचा फर्मान

बलुचिस्तान सरकारने सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या फोनच्या रिंग टोनमध्ये पाकिस्तान जिंदाबादचा नारा ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी मुख्य सचिवांनी बैठकीनंतर हा आदेश जारी करण्यात आला. या आदेशामुळे देशाबद्दल आदर आणि प्रेम वाढेल असे म्हटले आहे. बलुचिस्तानचे लोक 70 वर्षांपासून वेगळ्या देशाची मागणी करत आहेत. येथे दररोज दहशतवादी हल्ले होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT