Pakistan get angry on Rajnath Singh's Statement  Dainik Gomantak
ग्लोबल

राजनाथ सिंहांचे ते वक्तव्य 'बेजबाबदार आणि चिथावणीखोर', पाकिस्तानची आगपाखड

पाकिस्तान जबाबदारीने वागेल आणि शांतता प्रस्थापित करेल असेही पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे.

दैनिक गोमन्तक

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Sing) यांनी आपल्या एका भाषणात पाकिस्तानला (Pakistan) जोरदार फटकारले होते आणि पाकिस्तानने हार मानली नाही तर हा नवा आणि बलवान भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देईल असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता पाकिस्तान संतापला आहे. राजनाथ सिंह यांचे वक्तव्य 'बेजबाबदार आणि चिथावणीखोर' असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की पाकिस्तान भारताच्या "आक्रमकतेला" प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.(Pakistan get angry on Rajnath Singh's Statement)

पाकिस्तान जबाबदारीने वागेल आणि शांतता प्रस्थापित करेल असेही पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे पाकिस्तानला धमकावणारे बेजबाबदार, चिथावणीखोर आणि निराधार विधान आम्ही फेटाळून लावतो. इम्रान खान यांना कडक संदेश देताना राजनाथ सिंह म्हणाले होते, 'पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ असा संदेश भारताला द्यायचा आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, एकीकडे राजनाथ सिंह यांचे विधान दिशाभूल करणारे आहे, तर ते भारताचे शेजाऱ्यांशी असलेले वैर दर्शवते. मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तान कोणत्याही आक्रमक कारवाईपासून बचाव करण्यास तयार आहे. उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे भाषण देताना संरक्षण मंत्री म्हणाले होते, 'आम्ही पश्चिम सीमेवरील आमच्या शेजाऱ्याला स्पष्ट संदेश दिला आहे की जर त्याने सीमा ओलांडली तर आम्ही केवळ सीमेवरच प्रत्युत्तर देणार नाही तर त्याच्या हद्दीतही प्रवेश करू. आणि त्यांच्या हद्दीत जाऊन सर्जिकल आणि एअर स्ट्राइक करू.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला जोरदार फटकारले होते . पाकिस्तानने आपल्या कृत्यांमध्ये सुधारणा करावी, अन्यथा त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशा कडक शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला एक प्रकारचा इशाराच दिला होता .भारताने कधीही कोणत्याही देशावर हल्ला केला नाही. देशाने कोणत्याही परकीय भूमीचा ताबा घेतला नाही. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ही भारताची संस्कृती आहे, पण काही लोकांना ते समजत नाही. चीनचे नाव न घेता ते म्हणाले की, मला माहीत नाही, ही त्यांची सवय आहे की स्वभाव. पाकिस्तानचे नाव घेत ते म्हणाले की, ते दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना कडक संदेश देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT