Pakistan Afghan Tension Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Afghan Tension: पाकिस्तानात मोठी चकमक! 4 आत्मघाती हल्लेखोरांसह 25 दहशतवादी ठार, पाक-अफगाण सीमेवर पुन्हा तणाव; स्फोटकांचा साठा जप्त

25 Terrorists Killed: अफगाणिस्तान सीमेवरुन घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार आत्मघाती हल्लेखोरांसह (Suicide Bombers) 25 दहशतवाद्यांना पाकिस्तानी सैनिकांनी ठार केले.

Manish Jadhav

25 Terrorists Killed: आपले वाईट कर्म स्वतःच भोगत असलेल्या पाकिस्तानवर सध्या दहशतवादाचे (Terrorism) मोठे सावट आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मोठी कारवाई करण्यात आली. अफगाणिस्तान सीमेवरुन घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार आत्मघाती हल्लेखोरांसह (Suicide Bombers) 25 दहशतवाद्यांना पाकिस्तानी सैनिकांनी ठार केले. ही माहिती पाकिस्तानी सैन्याने रविवारी (26 ऑक्टोबर) दिली.

चकमकीत 5 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पाकिस्तानी सैन्याने (Pakistan Army) दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांशी झालेल्या या चकमकीत पाकिस्तानचे पाच सुरक्षा कर्मचारी देखील मारले गेले. सुरक्षा दलांनी शुक्रवार रात्री उत्तर वझिरीस्तान (North Waziristan) आणि कुर्रम (Kurram) जिल्ह्यांमध्ये ही मोठी मोहीम राबवली आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रे तसेच स्फोटकांचा साठा जप्त केला. कुर्रम जिल्ह्यातील गाकी आणि उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील स्पिनवाम जवळ अफगाणिस्तानमधून पाकिस्तानात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांच्या दोन मोठ्या गटांची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

'फितना अल ख्वारिज' संघटनेचे 4 आत्मघाती हल्लेखोर

सैन्याच्या निवेदनानुसार, सैनिकांनी दहशतवाद्यांच्या (Terrorists) या गटांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. या चकमकीत, 'फितना अल ख्वारिज' (Fitna Al Khawarij) या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित चार आत्मघाती हल्लेखोरांसह 15 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. पाकिस्तान सरकारने गेल्या वर्षी प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या संघटनेलाच 'फितना अल-ख्वारिज' म्हणून अधिसूचित केले होते.

शस्त्रसाठा जप्त

सैन्याने पुढे सांगितले की, त्याच दिवशी कुर्रम जिल्ह्यातील गाकी येथे घुसखोरी करणाऱ्या आणखी 10 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या दहशतवाद्यांकडून शस्त्रे, दारुगोळा आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली.

पाकिस्तानात दहशतवादी कारवाया वाढल्या

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात असे हल्ले वारंवार होत आहेत. यामध्ये दहशतवादी मुख्यतः पोलीस आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहेत. 2022 मध्ये सरकारने प्रतिबंधित टीटीपी (TTP) या संघटनेसोबत केलेला युद्धविराम करार (Ceasefire Agreement) मोडल्यानंतर दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली. गेल्याच आठवड्यात सुरक्षा दलांनी खैबर पख्तूनख्वामध्ये अनेक मोहिमांदरम्यान 34 दहशतवाद्यांना ठार केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

Goa electricity tariff hike: आठवड्यात दरवाढ मागे घ्या, अन्यथा...; काँग्रेस - आप शिष्टमंडळाची वीज खात्यावर धडक, आंदोलनाचा इशारा

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

SCROLL FOR NEXT