Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: जीडीपी वाढीच्या 100 पट महागाई, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठं भगदाड; दिवाळखोरीपासून फक्त...!

पाकिस्तान सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहे. एका बाजूला राजकीय संकट तर दुसऱ्या बाजूला गंभीर आर्थिक संकट (Pakistan Economic Crisis) आहे.

Manish Jadhav

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहे. एका बाजूला राजकीय संकट तर दुसऱ्या बाजूला गंभीर आर्थिक संकट (Pakistan Economic Crisis) आहे. परिस्थिती अशी आहे की, पाकिस्तान आता दिवाळखोरीपासून काहीच पावले दूर आहे.

याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशातील चलनवाढीचा दर (Pakistan Inflation) आता आर्थिक विकास दराच्या (Pakistan GDP Growth Rate) च्या तुलनेत 100 पट झाला आहे.

आर्थिक सर्वेक्षणात अर्थमंत्र्यांनी माहिती दिली

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था (Economy) सध्या वाईट टप्प्यातून जात आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात पाकिस्तानचा आर्थिक विकास दर केवळ 0.29 टक्के होता.

तर महागाई जवळपास 29 टक्क्यांवर पोहोचली होती. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी गुरुवारी आर्थिक वर्ष 2022-23 साठी आर्थिक सर्वेक्षण सादर करताना ही माहिती दिली.

जुलैपासून आर्थिक वर्ष सुरु होते

या सर्वेक्षणात, राजकीय अस्थिरता आणि अभूतपूर्व पूरस्थिती यांच्यामध्ये 30 जून रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे.

पाकिस्तानमध्ये (Pakistan) आर्थिक वर्ष दरवर्षी जुलैपासून सुरु होते आणि पुढच्या वर्षी जूनपर्यंत चालते, तर भारतासह जगातील बहुतेक देश एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षाचे अनुसरण करतात.

विकास दर लक्ष्यापेक्षा खूप मागे

आर्थिक सर्वेक्षणानुसार, चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानचा जीडीपी दर केवळ 0.29 टक्के होता, जो पाच टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा खूपच कमी होता. यामध्ये कृषी क्षेत्रात 1.55 टक्के, उद्योग क्षेत्रात 2.94 टक्के आणि सेवा क्षेत्रात 0.86 टक्के जीडीपी वाढ झाली आहे. या तिन्ही क्षेत्रांची कामगिरी लक्ष्यापेक्षा खूपच मागे पडली आहे.

महागाई जवळपास 3 पट वाढली

सर्वेक्षणानुसार, पाकिस्तानमध्ये जुलै 2022 ते मे 2023 या कालावधीत महागाईचा दर 29.2 टक्के होता, तर मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो 11 टक्के होता. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी 11.5 टक्के महागाईचे लक्ष्य ठेवले होते.

पाकिस्तानचे कर संकलन वाढले आहे, ही दिलासादायक गोष्ट असली तरी. फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूने जुलै 2022 ते एप्रिल 2023 पर्यंत 5,637.9 अब्ज रुपयांचा कर गोळा केला, जो मागील आर्थिक वर्षातील 4,855.8 अब्ज रुपयांपेक्षा 16.1 टक्के जास्त आहे.

8 वाजता बाजार बंद

पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेचा अंदाज इतर काही गोष्टींवरूनही लावता येतो. बिघडलेली परिस्थिती पाहता पाकिस्तानने रात्री 8 नंतर बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय विजेचा वापर कमी करण्यासाठी आहे.

त्याचवेळी, पाकिस्तानने अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये असलेले प्रतिष्ठित रुझवेल्ट हॉटेल भाड्याने दिले आहे. यामुळे पाकिस्तानला 220 दशलक्ष डॉलर्सची कमाई झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT