Indian Air Force Dainik Gomantak
ग्लोबल

Turkey Earthquake: पाकिस्तानची मुजोरी कायम; तुर्कीला मदत घेऊन जाणाऱ्या विमानाला परवानगी नाकारली

भीषण भूकंपामुळे तुर्की आणि सीरिया दोन देशात प्रचंड घबराट पसरली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Turkey Earthquake: तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीने जगाचं लक्ष वेधलं आहे. तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी अनेक भूकंपाचे धक्के जाणावले. तुर्की हा देश सोमवारी एकापाठोपाठ तीन भूकंपांनी हादरला. 

भूकंपामध्ये आतापर्यंत सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भूकंपाच्या सलग तीन धक्क्यांनी या दोन देशात प्रचंड घबराट पसरली आहे. 

एएनआय वृत्तसंस्थेने असोसिएट प्रेसच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार तुर्की आणि सीरियामधील भूकंपामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4000 वर पोहोचली आहे. सध्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे.

भारतातूनही तुर्कीसाठी मोठी मदत केली जात आहे. NDRF ची दोन पथकं प्रशिक्षित श्वान पथकासह तुर्कीमध्ये दाखल झाले आहे. यासोबतच भारताची पॅरोमेडिकल टीमही तुर्कीला पोहोचली आहे. हवामान बदलामुळे शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

दरम्यान, भारतीय हवाई दलाचे विमान C-17 हे विमान तुर्कीला मदत घेऊन रवाना झाले. ही मदत घेवून जात असताना पाकिस्तानने भारतीय हवाई दलाच्या विमानाला पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे विमानाला वळसा घालणे भाग पडले.

पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार तुर्कीला तातडीने मदत देण्याच्या मुद्द्यावर पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांनी बैठक बोलावली. तुर्कस्तानला एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, एएनआयच्या वृत्तानुसार, तुर्कीला दिलेल्या मदतीबद्दल तुर्कीचे राजदूत फिरात सुनेलने सोशल मीडियावर भारताचे आभार मानले आणि म्हणाले, “गरज असलेला मित्र खरोखर मित्र असतो.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT