Former Pakistan Prime Minister Nawaz Sharif: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरोधातील एका खटल्यात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. नवाझ शरीफ हे 4 वर्षांच्या परदेशातील वनवासानंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मायदेशी परतले आहेत.
यावेळी त्यांनी पुन्हा पाकिस्तानच्या (Pakistan) पंतप्रधानपदासाठी दावा केला आहे. अशा वेळी पाकिस्तानचा हा निर्णय नवाझ शरीफ यांच्यासाठी आणखी महत्त्वाचा ठरतो. नवाझ शरीफ यांच्या कोणत्या प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे ते आता तुम्हाला सांगणार आहोत.
दरम्यान, हा खटला भ्रष्टाचाराशी (Corruption) संबंधित आहे, ज्यामध्ये त्यांना शिक्षा झाली आणि त्यांना देशातून हद्दपारही व्हावे लागले होते. पण आता पाकिस्तानच्या अकाऊंटिबिलिटी न्यायालयाने नवाझ शरीफ यांना तात्पुरता दिलासा दिला आहे.
2020 मध्ये भ्रष्टाचार प्रकरणात जप्त केलेली त्यांची सर्व चल आणि जंगम मालमत्ता परत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
'द एक्सप्रेस ट्रिब्यून' या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, इस्लामाबाद अकाउंटेबिलिटी न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद बशीर यांनी शुक्रवारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) नेते शरीफ (73) यांच्या विरोधात तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणाची सुनावणी केली. त्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे.
दरम्यान, नवाझ शरीफ 21 ऑक्टोबर रोजी साडेचार वर्षांच्या वनवासानंतर मायदेशी परतले. अकाऊंटिबिलिटी न्यायालयाचे न्यायाधीश बशीर यांनी सूचित केले की, शरीफ यांनी आत्मसमर्पण केले असल्याने आणि त्यांच्या अटकेसाठी जारी केलेले वॉरंट रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश मागे घेतला जाऊ शकतो.
वृत्तानुसार, तोशाखाना प्रकरणात गुन्हेगार घोषित केल्यानंतर, 2020 मध्ये तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या शरीफ यांची शेतजमीन, मर्सिडीज बेंझ कार, लँड क्रूझर कार आणि इतर वाहने जप्त करण्यात आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.