Pakistan Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Attack: सीमाभाग रक्ताने माखला! पाकड्यांचा अफगाणिस्तानवर मोठा हल्ला, 29 बंडखोरांचा मृत्यू

Pakistan Attack On Afghanistan: पाकिस्तानी लष्कराने रविवारी (28 जून) रात्री अफगाणिस्तान सीमेवर एक अत्यंत मोठा हल्ला केला, ज्यामध्ये 29 बंडखोर मारल्याचे सांगण्यात आले.

Manish Jadhav

Pakistan Attack On Afghanistan: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. पाकिस्तानी लष्कराने रविवारी (28 जून) रात्री अफगाणिस्तान सीमेवर एक अत्यंत मोठा हल्ला केला, ज्यामध्ये 29 बंडखोर मारल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानी लष्कराशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी रविवारी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेला लागून असलेल्या भागात एक मोठे ग्राउंड ऑपरेशन राबवले. या ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांचे तळ आणि त्यांच्या सुरक्षित अड्ड्यांवर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये 29 बंडखोरांचा खात्मा करण्यात आला.

पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरार यांनी 'X' वर एका पोस्टद्वारे या संपूर्ण लष्करी कारवाईची अधिकृत माहिती दिली आणि वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, गेल्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक मोठे दहशतवादी हल्ले झाले होते. या दहशतवादी कारवायांना आणि हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठीच लष्कराच्या वतीने हे विशेष ऑपरेशन सुरु करण्यात आले होते.

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांविरुद्ध ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पाकिस्तानने (Pakistan) सीमेवर केलेल्या या मोठ्या लष्करी हल्ल्याबाबत अफगाणिस्तान सरकारच्या वतीने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा तात्काळ उत्तर देण्यात आलेले नाही.

या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील सीमावर्ती भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून लष्कराची गस्त वाढवण्यात आली. पाकिस्तानमध्ये सातत्याने होणाऱ्या अंतर्गत हल्ल्यांचे धागेदोरे सीमाभागाशी जोडलेले असल्याचा दावा पाकिस्तानी यंत्रणांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर लष्कराने केलेले हे ग्राउंड ऑपरेशन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. दोन्ही देशांमधील संबंध आधीच संवेदनशील असताना, या ताज्या लष्करी कारवाईमुळे सीमाभागातील वातावरण अधिकच तापण्याची शक्यता सुरक्षा विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. सीमेवरील या चकमकीनंतर दोन्ही बाजूंच्या लष्करी हालचालींवर आंतरराष्ट्रीय समुदायाचेही बारीक लक्ष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Diwali Magazine Tradition: गोव्याच्या साहित्यविश्वाचा दिवाळी फराळ! जाणून घ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT