Pakistan Afghanistan War Video Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Afghanistan War: पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक; 'टीटीपी'चे 7 तळ उद्ध्वस्त, 19 जणांचा मृत्यू Watch Video

Pakistan Afghanistan Attack: पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत शिरून 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भीषण हल्ला चढवला आहे.

Sameer Amunekar

इस्लामाबाद/काबुल: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत शिरून 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भीषण हल्ला चढवला आहे. या कारवाईत ७ महत्त्वाचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, प्राथमिक माहितीनुसार १९ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध कमालीचे ताणले गेले असून अफगाणिस्तानने चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

गुप्तचर माहितीच्या आधारे 'टार्गेटेड अटॅक'

पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी सोशल मीडियाद्वारे या लष्करी कारवाईची पुष्टी केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराने अत्यंत गुप्त पद्धतीने ही मोहीम राबवली. इंटेलिजन्सकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारावर अफगाण सीमेवरील दहशतवाद्यांच्या ७ प्रशिक्षण केंद्रांना लक्ष्य करण्यात आले.

या तळांवरूनच पाकिस्तानमध्ये घातपाती कारवायांचे नियोजन केले जात होते, असा दावा पाकिस्तानने केला आहे. केवळ टीटीपीच नव्हे, तर 'इस्लामिक स्टेट'चे (IS) दहशतवादीही या भागात आश्रयाला असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

आत्मघाती हल्ल्यांचा सूड

हा हल्ला म्हणजे गेल्या काही दिवसांत पाकिस्तानात झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटांना दिलेले सडेतोड उत्तर मानले जात आहे. विशेषतः खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात झालेल्या भीषण हल्ल्यात १२ जणांचा बळी गेला होता, तर बन्नू जिल्ह्यात एका लेफ्टनंट कर्नलसह दोन सैनिकांना वीरमरण आले होते. या घटनांनंतर पाकिस्तानने शनिवारी आणि रविवारी सलग कारवाई करत अफगाणिस्तानच्या पक्तिका आणि नंगरहार प्रांतात ड्रोन आणि विमानांद्वारे बॉम्बफेक केली.

तालिबान सरकार आणि दहशतवाद्यांचे कनेक्शन

पाकिस्तानने थेट आरोप केला आहे की, टीटीपीसारख्या संघटनांना अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे पूर्ण संरक्षण लाभत आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून पाकिस्तानात रक्तपात घडवून आणला जात असल्याचा दावा इस्लामाबादने वारंवार केला आहे. मात्र, तालिबानने हे आरोप फेटाळून लावले असून आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यामुळे सीमेवर तणाव वाढला असून दोन्ही देशांच्या सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT