India-Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Accuses India: चोराच्या उलट्या बोंबा! पाकिस्तानचेच भारतावर दहशतवादाचे आरोप

दैनिक गोमन्तक

Pakistan Accuses India: भारत आणि पाकिस्तानमधील वाद जगासाठी नवीन नाही. हे दोन्ही देशांमध्ये सातत्याने वाद दिसून येतात. हा वाद कधी सीमारेषांवरुन असतो, कधी पाकव्याप्त काश्मीरवरुन असतो आणि बऱ्याचदा दहशतवादावरुन असतो.

भारताने सातत्याने दहशतवादावरुन पाकिस्तानला चेतावणी दिली आहे. सीमापार दहशतवादामुळे भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील प्रदेशात कायम अस्थिरता दिसून येते.

आता पाकिस्तानने भारतावर दहशतवादाचे गंभीर आरोप केले आहेत. भारत पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरवत असल्याचे पाकिस्तानकडून म्हटले आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त पंजाबमध्ये फैसलाबादच्या जरानवाला भागात ख्रिश्चन समुदायाच्या अनेक चर्चंवर एकाचवेळी हल्ला करण्यात आला होता.

पाकिस्तानमधील कट्टरपंथीयांनी चर्चवर हल्ला करत तोडफोड केली आणि त्यांच्या घराला आगदेखील लावल्याची भीषण घटना घडल्याचे समोर आले आहे. आता या घटनेला भारताला जबाबदार धरले जात आहे. पंजाब प्रातांच्या पोलिस आईजीपींनी दावा केला आहे की, या घटनेत भारताची मोठी भूमिका आहे. भारतीच्या रॉ( RAW) एजन्सीने हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.

या घटनेवर पाकिस्तानच्या विदेश कार्यालय प्रवक्ता मुमताज जहरा बलूच यांनी आपले मत व्यक्त केले आहे. पाकिस्तानच्या राजकीय आणि संस्कृतीमध्ये अशा घटनांना थारा असू शकत नाही. पाकिस्तान सरकारने कायदेशीर प्रक्रिया सुरु केली असून या घटनेसाठी जबाबदार असलेल्या लोकांना शिक्षा दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, भारत जम्मू काश्मीरमध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित करत आहे. भारत सातत्याने अशा स्पर्धा आयोजित करुन जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असे करुन भारत काश्मीरी लोकांच्या भावनांना दाबू शकत नाही असे म्हटले आहे.

मात्र पाकिस्तानवर पूर्वीपासून दहशतवादाचे गंभीर आरोप आहेत. अनेक मोठे दहशतवाद्यांना पाकिस्तानने लपण्यासाठी जागा दिल्याचे अनेकवेळा जगासमोर आले आहे. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी पैसे पुरवत असल्याचेदेखील अनेक घटनांमधून समोर आले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये आर्थिक आणि राजकीय अस्थिरता दिसून येत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांचे अटकेचे नाटकीय चित्र रंगले होते.

इम्रान खान यांच्या समर्थकांनी त्यांच्या अटकेला मोठा विरोध केला असल्याचे दिसून आले आहे. आता पाकिस्तान( Pakistan)ने केलेल्या गंभीर आरोपावर भारत काय प्रत्युत्तर देणार, काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT