Pakistan Coal Mine Clash Between 2 Tribes: पाकिस्तानमध्ये सोमवारी (16 मे) ला कोळसा खाणीच्या हद्दवाढीवरून दोन गटांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यांनी सांगितले की, ही घटना पेशावरपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कोहाट जिल्ह्यातील डेरा आदम खेक भागात घडली.
डेरा आदम खेक परिसरात खाणीच्या हद्दवाढीवरून सानीखेल आणि जरघुनखेल जमातींमध्ये तुफान राडा झाला.
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले असून, तेथे जखमींवर उपचार केले जातील आणि मृतांचे शवविच्छेदन केले जाईल. पण जखमींचा नेमका आकडा कळू शकला नसला तरी दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात अनेकांचे बळी गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी परिस्थिती हाताळली
कोळसा खाणीत चकमक सुरू असतानाच पोलिस आणि इतर सुरक्षा दलांचे संयुक्त पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रतिस्पर्धी जमातींमधील गोळीबार थांबवला.
दर्रा आदम खेल पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कोळसा खाणीच्या हद्दवाढीवरून सानिखेल आणि जारघुणखेल जमातींमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू असून, हा गोंधळ मिटवण्यासाठी केलेले अनेक समेट निष्फळ ठरले आहेत.
जमातीच्या लोकांचा स्वभाव हट्टी
दोन्ही जमातीतील लोकांचा स्वभाव हट्टी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन जमातींमध्ये दुख:द घटना घडत असतात. त्यामुळे दोन्ही बाजूंनी मोठी जीवितहानी झाली आहे. त्याचवेळी घटनेनंतर जखमींना रुग्णालयात नेले असता, त्यातील दोघांचाही मृत्यू झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.