Overcrowded Boat Sinks In The Sea Near Cape Verde At Least 63 People Feared Dead. Dainik Gomantak
ग्लोबल

Cape Verde: स्थलांतरित प्रवाशांची बोट समुद्रात बुडाली; 63 जणांनी गमावला जीव

Cape Verde: हा जगातील सर्वात धोकादायक मार्गांपैकी एक मानला जातो. 2022 मध्ये कॅनरी बेटांवर पोहोचण्याच्या प्रयत्नात किमान 559 लोक मरण पावले आहेत, तर पहिल्या सहा महिन्यांत 15 जहाज बुडाले आहेत.

Ashutosh Masgaunde

Overcrowded Boat Sinks In The Sea Near Cape Verde At Least 63 People Feared Dead:

आफ्रिकन देशातील केप वर्देजवळ बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. अल जझीराने इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) च्या अधिकार्‍यांचा हवाला देत म्हटले आहे की, केप वर्देजवळ बोट उलटल्याने 63 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

यावेळी 38 जणांना वाचवण्यात आले आहे. आयओएमने बुधवारी सांगितले की, ही बोट जुलैमध्ये सेनेगल मधून निघाली होती. ज्यामध्ये स्थलांतरीत लोक होते.

पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीपासून सुमारे 620 किमी अंतरावर असलेल्या केप वर्दे येथील माध्यमांच्या वृत्तानुसार, सेनेगलच्या परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली की, 38 जणांना बोटीतून वाचवण्यात आले आहे. तर मृतांची संख्या 63 इतकी आहे. या बोटीत 100 हून अधिक प्रवासी होते.

पश्चिम आफ्रिकेपासून कॅनरी बेटांपर्यंतचा अटलांटिक महासागर मार्ग, स्पेनला जाण्यासाठी वापरला जातो.

हा जगातील सर्वात धोकादायक मार्गांपैकी एक मानला जातो. IOM च्या मते, 2022 मध्ये कॅनरी बेटांवर पोहोचण्याच्या प्रयत्नात किमान 559 लोक मरण पावले आहेत, तर याच मार्गावर या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 15 जहाज बुडून 126 लोक मरण पावले किंवा बेपत्ता झाले.

केप वर्दे येथे दारिद्र्य आणि युद्धाचा सामना करणारे असंख्य नागरिक पळून जाण्याचा प्रयत्न करत असतात.

हजारो निर्वासित आणि स्थलांतरित लोक दरवर्षी धोकादायक प्रवास करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात.

ते बर्‍याचदा तस्करांनी पुरवलेल्या माफक बोटी किंवा मोटार कॅनोमध्ये प्रवास करतात ज्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असतात.

जानेवारीमध्ये, केप वर्देमधील बोटीत वाहून गेलेल्या सुमारे 90 निर्वासित आणि स्थलांतरितांची सुखरुप सुटका करण्यात आली होती. हे लोक सेनेगल, गाम्बिया, गिनी-बिसाऊ आणि सिएरा लिओनचे होते.

56 मृत देह अद्याप बेपत्ता

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) च्या प्रवक्त्याने एएफपीला सांगितले की आतापर्यंत सात लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, तर आणखी 56 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.

प्रवक्त्याने सांगितले की, सामान्यतः, जेव्हा बोट बुडाल्यानंतर लोक बेपत्ता झाल्याची तक्रार केली जाते, तेव्हा त्यांना मृत समजले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT