"Other dogs don't play with me..." The agony of a man who Spent 10 lakhs and became a dog. Dainik Gomantak
ग्लोबल

"इतर कुत्री माझ्याशी खेळत नाहीत..." 12 लाखांचा चुराडा करून कुत्रं बनलेल्या व्यक्तीची व्यथा

आपल्या भावना व्यक्त करताना कुत्रा झालेला व्यक्ती म्हणाला, "तो थोडा आश्चर्यचकित झाला कारण इतर कुत्र्यांनी मला त्यांच्यासारखे वागवले नाही. त्यांच्यापैकी एकही माझ्याशी खेळत नाही."

Ashutosh Masgaunde

"Other dogs don't play with me..." The agony of a man who Spent 10 lakhs and became a dog:

टोको नावाच्या जपानमधील एका व्यक्तीने अपारंपरिक जीवनशैलीशी जुळवून घेतल्याने जगभरात चर्चा झाली होती. कुत्र्याच्या पोशाखासाठी त्याने 12 लाखांहून अधिक खर्च केला होता. व कुत्रा झाला होता.

या कुत्रा झालेल्या टोकोला ह्युमन बॉर्डर कोली' म्हणून ओळखले जाते. अलीकडे, त्याने कुत्रा झाल्यानंतर त्याच्या आयुष्याबद्दल माहिती देताना, सांगितले की इतर कुत्र्यांकडून त्याला समान वागणूक दिली जात नाही. ती कुत्री याच्याशी खेळत नाहीत.

द सनशी बोलताना, टोकोने उघड केले की, त्याने कुत्र्यांशी मिसळण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, याचा अनुभव अपेक्षेप्रमाणे आला नाही. त्या कुत्रा झालेल्या व्यक्तीने सांगितले, "तो थोडा आश्चर्यचकित झाला कारण इतर कुत्र्यांनी मला त्यांच्यासारखे वागवले नाही. त्यांच्यापैकी एकही माझ्याशी खेळत नाही."

पुढे, कुत्रा झालेल्या या व्यक्तीने असा दावा केला की, तो आता त्याच्यासारख्याच कुत्रा झालेल्या व्यक्तीच्या शोधात आहे. तो म्हणाला, "मला वाटते की असे काहीतरी अस्तित्वात असल्यास ते खूप चांगले होईल. मला त्यांना भेटायला आवडेल."

"मी कायमचा कुत्रा राहणार नाही. मी महिन्यातून फक्त काही वेळा कुत्रा बनतो. तात्पुरते पोशाख घालणे काही लोकांना वाटते तितके सामान्य नाही. हा माझा छंद आहे आणि त्यामुळेच मी असे प्रकार करत असतो. याबद्दल माझ्यावर कोणी टीका करत असले तर मला त्याची चिंता नाही," असे टोकोने सांगितले.

टोक्योचा असणाऱ्या या व्यक्तीने गेल्या वर्षी 12 लाख रुपये खर्च करून कुत्र्याचा पोषाक शिवला होता. त्यामुळे तो जगभरातच चर्चेत आला होता.

यानंतर ‘I want to be an animal’ या YouTube चॅनेलवर जवळपास 60,000 लोकांनी सब्सक्रायब केले होते. या चॅनलवर तो आता कुत्र म्हणून जगतानाचे व्हिडिओ पोस्ट करतो.

त्याने अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये तो पट्ट्यावर चालत आहे आणि अगदी पार्कमध्ये फिरत आहेत. ऑगस्टमध्ये अपलोड केलेला तो व्हिडिओ 7 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'22 मिनिटांचा तो थरार' विसरु नका, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकड्यांना थेट इशारा; 'ऑपरेशन सिंदूर' अजून संपलेलं नाही!

UPI Transactions Record March 2026: डिजीटल इंडियाचा नवा विक्रम! UPI व्यवहारांनी गाठला ऐतिहासिक टप्पा; मार्च महिन्यात 22.64 अब्ज ट्रान्झॅक्शनची नोंद

ना विराट, ना सचिन; युवीच ठरला हिरो! अर्जुन तेंडुलकरनं बॅटिंग आयडॉलवरुन चकवलं, युवराजच्या 'फियरलेस' शैलीचा दिवाना

एव्हरेस्टवर गिर्यारोहकांच्या जिवाशी खेळ! 167 कोटींच्या विमा घोटाळ्याचा पर्दाफाश, पर्यटकांच्या अन्नात कालवलं विष; 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Grah Gochar 2026: द्विद्वादश आणि अष्टादश योगाचा धमाका! शुक्र, वरुण आणि बुधाची युती; 'या' 5 राशींच्या लोकांना धनलाभाची 'सुवर्णसंधी'

SCROLL FOR NEXT