ग्लोबल

57 मुस्लिम देशांचे संघटन OIC ने भारताविरोधात पुन्हा ओकली गरळ, वक्तव्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय

ओआयसीच्या या वक्तव्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Organisation of Islamic Cooperation: इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीने जम्मू-काश्मीरवर पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनचे सरचिटणीस हिसेन ब्राहिम ताहा यांच्या हवाल्याने एक निवेदन जारी केले आहे.

OIC ने जम्मू आणि काश्मीरचा वाद सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार ठोस पावले उचलण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले आहे. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जम्मू-काश्मीरचा भारताकडे असलेल्या ताब्याला 76 वर्षे पूर्ण होताहेत.

इस्लामिक शिखर परिषद आणि OIC परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतील निर्णय आणि ठरावांचा संदर्भ देत सरचिटणीस हिसेन ब्राहिम ताहा यांनी भारताला जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या मूलभूत मानवी हक्कांचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये रद्द करण्यात आलेले कलम 370 पुनर्स्थापित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ओआयसीने भारत आणि जम्मू-काश्मीरबाबत गरळ ओकण्याची ही पहिलीच वेळ नाही. ओआयसी भारताविरोधात सतत गरळ ओकत आहे. ऑक्टोबर 2022 मध्येही OIC ने एक निवेदन जारी करून भारत सरकारला जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 बहाल करण्याची मागणी केली होती. याआधीही काश्मीर मुद्द्यावर ओआयसीकडून असे विधान पाहायला मिळाले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर दबाव निर्माण करता येईल, ओआयसीच्या या वक्तव्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे.

OIC चे पूर्ण नाव Organisation of Islamic Cooperation आहे. याचे मुख्यालय सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात असून, ही 57 मुस्लिम बहुल देशांची संघटना आहे. ओआयसीवर आखाती देश सौदी अरेबिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांचे वर्चस्व मानले जाते. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सौहार्द निर्माण करताना मुस्लिमांचे संरक्षण करणे हा त्याचा उद्देश आहे.

चार खंडातील 57 देशांची ही संघटना सुमारे 1.5 अब्ज लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते. त्याच्या सदस्य देशांचा एकूण जीडीपी सुमारे 7 ट्रिलियन डॉलर आहे. OIC हा संयुक्त राष्ट्रांनंतर जगातील दुसरा सर्वात मोठा आंतरशासकीय गट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: '..आमचे पैसे परत मिळवून द्या'! Cash For Job प्रकरणी फसवणूक झालेल्यांचे CM सावंतांसमोर गाऱ्हाणे; Watch Video

Pooja Naik: 'देसाई, पार्सेकरांना पैसे दिल्‍याचे पुरावे माझ्‍या मोबाईलमध्‍ये'! पूजा नाईकचा दावा; Special Interview

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

SCROLL FOR NEXT