Opposition leader of Ukraine arrested on treason charges Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेनचे विरोधी पक्षनेते गुप्तचर यंत्रणेच्या कारवाईत गजाआड

युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीचे प्रमुख इव्हान बाकानोव्ह यांनी एजन्सीच्या टेलिग्राम चॅनेलवर मेदवेदचुकच्या अटकेची पुष्टी केली.

दैनिक गोमन्तक

युक्रेनमधील विरोधी पक्षनेते आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय व्हिक्टर मेदवेदचुक यांना युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांनी एका विशेष कारवाईत अटक केली आहे. (Opposition leader of Ukraine arrested on treason charges)

युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीचे प्रमुख इव्हान बाकानोव्ह यांनी एजन्सीच्या टेलिग्राम चॅनेलवर मेदवेदचुकच्या अटकेची पुष्टी केली. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही अटक केलेल्या मेदवेदचुकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. झेलेन्स्कीच्या टेलिग्राम चॅनेलवरून प्रसिद्ध झालेल्या या फोटोमध्ये, विरोधी पक्षनेते मेदवेदचुक हे हातकडी घातलेले दिसत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाचा हल्ला सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते मेदवेदचुक यांना युक्रेनमध्ये (Ukraine) देशद्रोहाच्या आरोपाखाली नजरकैदेत ठेवण्यात आले होते, परंतु युद्ध (War) सुरू झाल्यानंतर लगेचच ते गायब झाले. मात्र, त्याची वकील लॅरिसा चेरेडचेन्को यांनी तो पळून गेल्याचे आरोप फेटाळून लावले.

राष्ट्रवादी गटांच्या धमक्यांमुळे मेदवेदचुक यांना राजधानी कीव येथे हलवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. विरोधी राजकारणी मेदवेदचुक यांना प्रथम देशद्रोहाच्या आरोपाखाली आणि क्राइमियामध्ये राज्य संसाधने लुटण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 2014 मध्ये रशियाने (Russia) क्रिमियाला युक्रेनपासून वेगळे केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT