Russia Ukrain War  Dainik Gomantak
ग्लोबल

रशियाला युक्रेन युद्ध जड जातेय? 1 वर्षात 9 ट्रिलियन डॉलर्स, 6300 रणगाडे, 300 लढाऊ विमाने नष्ट तरीही...

एक वर्षाच्या कालावधीत रशियाचा युद्धात किती नुकसान झाले याची आकडेवारी समोर आली आहे.

Pramod Yadav

रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्धाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी रोजी रशियन सैन्याने युक्रेनवर तीन बाजूंनी हल्ला केला होता. युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवून झेलेन्स्कीची सत्ता उलथून टाकण्याचा रशियाचा प्रयत्न होता. जिथे रशियाने यासाठी लाखो सैनिक उभे केले, तिथे क्षेपणास्त्रांचा वर्षाव करून युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली.

एक वर्षाच्या कालावधीत रशियाचा युद्धात किती नुकसान झाले याची आकडेवारी समोर आली आहे.

आज, युद्धाला एक वर्ष झाले तरीही, रशिया अजूनही युक्रेनमध्ये आपल्या ध्येयापासून खूप दूर आहे. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांच्या शस्त्रांनी सज्ज असलेला युक्रेन आता रशियासाठी आणखी एक 'अफगाणिस्तान' बनत चालला आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. या युद्धात आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 63 लाख लोक बेघर झाले आहेत.

अमेरिकेच्या न्यूजवीक नियतकालिकाने दिलेल्या वृत्तानुसार, या युद्धात पुतिन यांच्या सैन्याला 1 वर्षात 9 ट्रिलियन डॉलर्सचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या एकूण 3 अब्ज डॉलरच्या परकीय चलनाच्या साठ्यापेक्षा हे प्रमाण 3,000 पट जास्त आहे. तसेच, रशियाची 300 लढाऊ विमाने आणि 6,300 हून अधिक सशस्त्र वाहने नष्ट झाली आहेत. युक्रेनच्या म्हणण्यानुसार, 1,30,000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत.

युद्धात एवढ्या नुकसानीची कल्पनाही रशियाने केली नव्हती. एवढे नुकसान होऊनही पुतिन यांनी युक्रेनमधील युद्ध सुरूच ठेवण्याची शपथ घेतली आहे. युक्रेन युद्धात रशियाने आतापर्यंत 9 ट्रिलियनचा आकडा ओलांडला आहे.

सीनने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार रशिया युद्धावर दररोज 900 दशलक्ष खर्च करत आहे. 'रशियाने जर क्षेपणास्त्रासाठी 1 दशलक्ष डॉलर्स खर्च केले असतील तर त्यांनी ते 2 दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढवले ​​आहेत.

युक्रेन युद्धात रशियाने आपले निम्मे रणगाडे गमावले आहेत असा अंदाज आहे. तर, एकूण 1,769 लढाऊ वाहने नष्ट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षभरात 1,30,000 रशियन सैनिक मारले गेले आहेत. याशिवाय 6,300 युद्ध वाहने आणि 300 लढाऊ विमाने नष्ट करण्यात आली आहेत. असा अंदाज युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT