Lottery Dainik Gomantak
ग्लोबल

लॉटरीनं केले मालामाल; दुकानदाराची एक चूक अन् करोडोंचा फायदा

एका व्यक्तीने लॉटरीमधून 6 कोटींहून अधिक रुपये जिंकले आहेत.

दैनिक गोमन्तक

एका व्यक्तीने लॉटरीमधून 6 कोटींहून अधिक रुपये जिंकले आहेत. आणि यासाठी तो लॉटरी (Lottery) टर्मिनलच्या क्लर्कचे आभार मानत आहे. तर क्लर्कच्या चुकीमुळेच एवढी मोठी लॉटरी लागल्याचे या व्यक्तीचे मत आहे. जोश बस्टर असे या व्यक्तीचे नाव असून हे प्रकरण अमेरिकेतील (America) लोवा प्रांत घडले आहे. (One mistake of a shopkeeper and the benefit of crores)

जोश हे शुक्रवारी रात्रीच्या मेगा मिलियन्स ड्रॉची तिकिटे घेण्यासाठी लॉटरी टर्मिनलवरती पोहोचले आणि तिथे त्यांनी 5 नंबर्सची मागणी केली. मात्र चुकून दुकानातील क्लर्कने तिकिटावरती एकच नंबर प्रिंट केला. नंतर उरलेले चार नंबर्स दुसऱ्या तिकिटावर प्रिंट करून त्यांना दिले. दुकानातील क्लर्कच्या या चुकीमुळेच त्यांना लॉटरी लागल्याचे जोश यांचे मत आहे. क्लर्कने चूक केली नसती आणि एका तिकिटावर सर्व नंबर्स प्रिंट केले असते, तर त्या नंबर्समध्ये अंतर राहिले नसते, असे जोश यांनी म्हटले.

"मी कामावर जाण्यासाठी सकाळी लवकर उठलो, यानंतर मी लॉटरी अॅप उघडले आणि माझा विनर नंबर तिथे सर्च केला. मी माझी तिकिटे नेहमी कारच्या कन्सोलमध्ये ठेवलेली असतात, आणि मी कारमध्येच लॉटरी विजेत्यांची नावे तपासली. त्यानंतर मी धावतच घरामध्ये गेलो. सुरवातीला माझा विश्वासच बसला नाही. सहसा माझे नशीब चांगले नसते पण, असे जोश यांनी सांगितले.

जोश यांनी आपली बक्षीस रक्कम क्लाइव्ह येथील लोवा लॉटरी मुख्यालयातून गोळा केली. लोवा लॉटरीने सांगितले की, जोश यांनी त्यांचे तिकीट वेस्ट बर्लिंग्टन येथील एमके मिनी मार्टमधून विकत घेतले होते. जोश यांना फक्त 124 कोटी रुपयांच्या जॅकपॉट नंबरमधून पहिले 5 नंबर मिळणार होते. त्यामुळेच त्यांना मेगा बक्षीस मिळाले नाही आणि त्यांना 6 कोटी रुपये मिळाले. दरम्यान, या पैशाने माझ्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होणार आहेत. आता सर्व आर्थिक चिंता संपल्या, असे जोश यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT