Musa Muhammadi
Musa Muhammadi Dainik Gomantak
ग्लोबल

प्रसिद्ध टीव्ही अँकर रस्त्यावर विकतोय स्ट्रीट फूड; तालिबानी राजवटीतील विदारक वास्तव

दैनिक गोमन्तक

News Anchor Selling street Food: तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाला अनेक आर्थिक आणि राजकीय आव्हांनाचा सामना करावा लागला आहे. देशात एवढा बदल झाला आहे की, मोठ्या व्यावसायिकांनाही त्यांच्या नोकऱ्यांच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच अशी काही छायाचित्रे समोर आली आहेत जी अफगाणिस्तानचे वास्तव दाखवतात. (once a famous tv anchor today forced to sell food on the streets such was the situation under taliban rule)

रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारा न्यूज अँकर

हमीद करझाई सरकारसोबत काम केलेल्या कबीर हुकमल यांनी अलीकडेच केलेल्या ट्विटर पोस्टवरुन देशातील किती प्रतिभावान व्यावसायिकांना गरिबीच्या खाईत ढकलण्यात आले आहे हे दिसून येते. हकमल यांनी मुसा मुहम्मदी या अफगाण पत्रकाराचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये, हकमल यांनी लिहिले की मुहम्मदी अनेक वर्षांपासून मीडिया जगताचा एक भाग होता, तथापि, अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) इतकी भयानक आर्थिक परिस्थिती आहे की, आता त्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर स्ट्रीट फूड विकावे लागत आहे.

तालिबान राजवटीत हेच घडले

तसेच, मुसा मुहम्मदी यांनी अनेक टीव्ही चॅनेलमध्ये अँकर आणि रिपोर्टर म्हणून काम केले आहे. मात्र आता त्यांच्याकडे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. आता ते काही पैसे कमवण्यासाठी स्ट्रीट फूड विकतायेत. तालिबानची सत्ता आल्यापासून अफगाणांना गरिबीचा सामना करावा लागत आहे.

सोशल मीडिया कहाणी व्हायरल

सध्या मुहम्मदी यांची कहाणी सोशल मिडीयावर (Social Media) खूप व्हायरल होत आहे. जेव्हा अँकरची ही गोष्ट राष्ट्रीय रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या उच्च अधिकार्‍यांपर्यंत पोहोचली तेव्हा महासंचालक अहमदउल्ला वासिक यांनी ट्विट करत म्हटले की, 'माजी टीव्ही अँकर आणि रिपोर्टर्संना लवकरच सेवेत रुजू करुन घेऊ.'

महिलांसाठी नोकरीचे संकट

विशेष म्हणजे, तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून हा देश मानवतावादी आणि आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तालिबानने (Taliban) गेल्या काही महिन्यांत मीडिया आउटलेटवरही कारवाई केली आहे. यामध्ये अनेक पत्रकार विशेषत: महिलांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa And Kokan Today's Live News: खोर्ली-म्हापसा येथे आढळला पुरुषाचा मृतदेह

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

Lairai Devi jatra 2024 : ‘लईराई’चा कौलोत्सव अभूतपूर्व उत्साहात; शिरगावात भक्तिमय वातावरण

Cashew Production Declined: काजू पीक घटले; दारूभट्ट्या थंडावल्या, हंगाम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT