Myanmar News: इस्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे. दरम्यान, भारताच्या शेजारी देश म्यानमारमध्ये विस्थापितांच्या शिबिरात बॉम्बस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. या बॉम्बस्फोटात जवळपास 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
म्यानमारच्या लष्कराने सोमवारी उत्तर काचिन राज्यातील विस्थापित लोकांच्या छावणीवर हवाई हल्ला केल्याचा आरोप आहे.
यामध्ये 13 मुलांसह 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. एका मानवाधिकार गट आणि स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, 'काचिन ह्युमन राइट्स वॉच'च्या प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले की, लाइझा शहराच्या उत्तरेकडील भागात विस्थापित लोकांसाठी बांधलेल्या छावणीवर झालेल्या हल्ल्यात सुमारे 60 लोक जखमी झाले आहेत.
या शहरात बंडखोर काचिन इंडिपेंडन्स आर्मीचे मुख्यालय देखील आहे. लाइझा हे म्यानमारचे (Myanmar) दुसरे सर्वात मोठे शहर मंडालेच्या ईशान्येस 324 किलोमीटर अंतरावर आहे.
जेकब म्हणून ओळखणाऱ्या प्रवक्त्याने सांगितले की, रात्री 11 वाजता झालेल्या हवाई हल्ल्यात 13 मुलांसह 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
जेकब म्हणाले की, “आम्ही या अमानुष हत्येचा तीव्र निषेध करतो. या कारवाईमुळे काचिनमधील लोकांमध्ये रोष आहे. काचिन न्यूज ग्रुप या स्थानिक ऑनलाइन न्यूज वेबसाइटने सांगितले की, लढाऊ विमानांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात 30 हून अधिक विस्थापित लोकांचा मृत्यू झाला आहे.
रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आल्याने याबाबत स्पष्ट माहिती नाही. फेब्रुवारी 2021 मध्ये आँग सान स्यू की यांचे लोकशाहीवादी सरकार (Government) उलथवून लावत लष्कराने सत्ता आपल्या हातात घेतली. विशेष म्हणजे, लष्कराने सत्ता हाती घेतल्यापासून देशात अराजकतेची परिस्थिती आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.