Swami Nithyananda  Dainik Gomantak
ग्लोबल

Swami Nithyananda च नाही तर या पाच व्यक्तींनीही निर्माण केले स्व:ताचे देश

दैनिक गोमन्तक

Swami Nithyananda: कैलासाची स्वतंत्र स्थापना केलेल्या नित्यानंद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. कैलासाच्या ऑफीशिअल अकाऊंटवरुन इ- नागरिकता देणार असल्याची माहीती दिली आहे. ज्यांना हिंदू समुदायाबरोबर जोडून घ्यायचे आहे.

त्याचबरोबर, ज्यांना हिंदूचे जगातल्या कोणत्याही भागात छळ झाला असेल त्या हिंदूना कैलासामध्ये नागरिकता मिळू शकते असे या अकाऊंटवर म्हटले आहे. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भारतातून फरार झालेल्या नित्यानंदने दक्षिण अमेरिकेत कैलासाची स्थापना केल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात फक्त नित्यानंद असा एकटा व्यक्ती नाही ज्याने स्वतंत्र देश वसवला आहे. आणखी पाच व्यक्ती असे आहेत ज्यांनी आपल्या स्वतंत्र देशाची निर्मिती केली आहे.

1. केविन बॉघ, Republic of Molossia

नित्यानंदप्रमाणेच केविन बॉघ या व्यक्तीने रिपब्लिक ऑफ मोलोसिया या देशाची निर्मिती केली आहे. रिपब्लिक ऑफ मोलोसिया हा देश दोन एकरमध्ये वसला आहे. या देशात एकूण ३४ नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे.

विशेष म्हणजे, या 34 नागरिकामधले 4 कुत्रे आहेत आणि कुत्र्यांनादेखील नागरिकता दिली जाते. रिपब्लिक ऑफ मोलोसियाची स्वताची स्वतंत्र चलन आहे.व्हॅलोरा असे या चलनाचे नाव आहे.

केविन बॉग हा नेहमी मेडल असलेल्या मिलिटरी ड्रेसमध्ये दिसून येतो. अनेक टायटल्स या व्यक्तीने स्वत:ला देऊन स्वताला स्वतंत्र देशाचा शासक मानतो.

Republic of Molossia

2. विट जेडलिका Liberland

विट जेडलिकाने 13 एप्रिल 2015 ने Liberland या देशाची निर्मिती केली आहे. क्रोशिया आणि सर्बिया या दोन देशांच्या मध्ये डेन्युब नदीच्या किनारी या देशाची निर्मिती केली आहे. अडीच लाखाच्या वर या देशाची लोकसंख्या आहे.

Liberland

3. पूर्व सैनिक फोर्ट रफ्स ने वसवले Sealand

फोर्ट रफ्स या माजी सैनिकाने इंग्लडच्या किनारी भागात सीलॅंड नावाचा देश वसवला आहे. हा लहान देश दोन मोठ्या पिलर्सवर उभा आहे. आज या देशाची लोकसंख्या 27 इतकी आहे.

Sealand

4. रिपब्लिक ग्लेशिअर

चिली आणि अर्जेंटिना या दोन देशामध्ये असलेल्या रिकाम्या जागेला ग्रीनपीसच्या पर्यावरणप्रेमींनी रिपब्लिक ग्लेशिअर हा देश वसवला आहे. जलसंपत्तीचे सरंक्षण करण्यासाठी 2014 मध्ये या नवीन देशाची घोषणा करण्यात आली. आज या देशाची लोकसंख्या जवळपास एक लाख आहे.

Republica Glaciar

5. Principality of Pontinha

मैडिरा द्वीपसमूहावरचा एक किल्ला पोर्तुगालचा राजा कार्लोस I ने 1903 मध्ये विकला होता. तो एका शाळा शिक्षका रेनाटो डी बैरोस यांनी खरेदी केला आहे. त्यांनी त्याला स्वतंत्र देश घोषित केले. आता सध्या या देशात फक्त चार लोक राहतात.

Principality of Pontinha

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT