No meeting with Indian foreign ministers yet Foreign Minister Qureshi gave an explanation 
ग्लोबल

भारतीय परराष्ट्र मंत्र्यांसोबत अद्याप बैठक ठरली नाही; परराष्ट्र मंत्री कुरेशी यांनी दिले स्पष्टीकरण

गोमंतक वृत्तसेवा

भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांच्याशी कोणत्याही प्रकारची बैठक ठरलेली नाही. किंवा तशाप्रकारची कुठलीही विनंती करण्यात आलेली नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी मंगळवारी म्हणाले. ते ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे पार पडलेल्या 'हार्ट ऑफ आशिया' परिषदेच्या वेळी बोलत होते.

पाकिस्तानच्या लष्कराकडून नुकत्याच झालेल्या शांतता कराराच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये संभाव्य बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. शाह महमूद कुरेशी यांनी पाकिस्तानचे प्रसिध्द वृत्तपत्र डॉनला सांगितले, ‘’त्यांच्यात आणि जयशंकर यांच्यात कोणतीही बैठक ठरली नाही किंवा अशी विनंती देखील केली गेली नाही.’’

भारत आणि पाकिस्तान या राजनयिक संबंधाच्या पुनर्थस्थापनेसाठी शांतपणे वाटाघाटी करत असल्याच्या मिडियाच्या अनुमोदनाबद्दल विचारले असता कुरेशी म्हणाले, अदयाप असा कोणत्याही स्वरुपाचा निर्णय झालेला नाही. जयशंकर यांना गेल्य़ा आठवड्यामध्ये प्रश्न विचारला होता, परिषदेच्या वेळी शाह महमूद कुरेशी यांची भेट घेणार आहात का? या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले नाही. (No meeting with Indian foreign ministers yet Foreign Minister Qureshi gave an explanation)

ते म्हणाले की, माझे वेळापत्रक ठरत आहे. आतापर्यंत अशी कोणतीही बैठक नियोजीत केली आहे मला वाटत नाही,’’ असे त्यांनी 26 मार्च रोजी नवी दिल्ली येथील इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये सांगितले आहे. आपला सहभाग जाहीर करताना परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की जयशंकर 9 व्या हार्ट ऑफ आशिया’ इस्तंबूल प्रकियेच्या मंत्री परिषदेत इतर सहभागी देशांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले की, परिषदेच्या वेळी शाह महमूद कुरेशी हे प्रमुख ‘’प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय भागिदारांशी सल्लामसलत’’ करतील
 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT