No Death Rule Dainik Gomantak
ग्लोबल

मरना मना है! जगातील अशी ठिकाणे जिथे मृत्यूवर आहे बंदी...

No Death Rule: जगातील सर्वच देशांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळे नियम बनवले गेले आहेत, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मृत्यूसाठीही काही नियम असतील.

Manish Jadhav

No Death Rule: जगातील सर्वच देशांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळे नियम बनवले गेले आहेत, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मृत्यूसाठीही काही नियम असतील. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही ठिकाणांबद्दल जिथे मृत्यूवर पूर्णपणे बंदी आहे.

मृत्यूनंतरही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याची अनेक कारणे आहेत. नॉर्वे, इटली, जपान, फ्रान्समध्ये अशी काही ठिकाणे आहेत, जिथे मृत्यूनंतर शिक्षेची तरतूद आहे.

अनोखे नियम

वास्तविक, भौगोलिक आणि पर्यावरणीय कारणांमुळे नॉर्वे, इटली, जपानसह या देशांतील काही ठिकाणी मृत्यूवर बंदी घालण्यात आली आहे.

नॉर्वेच्या (Norway) लॉन्गयेरबायनमध्ये 70 वर्षांपासून मृतदेह दफन केले गेले नाहीत, कारण तिथे इतका बर्फ आहे की मृतदेह सडत नाहीत किंवा नष्टही होत नाहीत. येथे आजारी व्यक्ती किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तीला दुसऱ्या शहरात नेले जाते.

इटलीतील फाल्सियानो डेल मेसिको नावाच्या ठिकाणी हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात आहे. इथे तर यासंबंधी कायदा आहे. कारण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागाच उरलेली नाही.

आजारी असणे हा देखील गुन्हा आहे

एका मीडिया रिपोर्टनुसार, जपानमधील (Japan) इत्सुकुशिमा येथे 1878 पासून मृत्यू आणि जन्मावर बंदी घालण्यात आली आहे. दक्षिण इटलीतील सेलियामध्ये आजारी असणे हा देखील गुन्हा आहे. असाच काहीसा प्रकार स्पेनच्या लांझारॉनमध्ये आहे, जिथे स्मशानभूमींची कमतरता आहे.

तर्क काय आहे

काही ठिकाणी स्थानिक वातावरणामुळे तर काही ठिकाणी स्मशानभूमी नसल्यामुळे असे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

तथापि, त्यांच्या बाजूने असा युक्तिवाद केला जातो की, लोकांनी त्यांच्या आरोग्याबद्दल जागरुक असले पाहिजे. काही ठिकाणी तर जनजागृती मोहिमेत सहभागी न झाल्यास त्यांना दंड ठोठावला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT