Citizenship Dainik Gomantak
ग्लोबल

Citizenship: कैलासामध्ये हिंदूना मिळणार नागरिकत्व; जाणून घ्या ही आहे प्रक्रिया

Citizenship: कैलासा या देशात नागरिकता देत आहे.

दैनिक गोमन्तक

Citizenship: भारतातून फरार झालेला नित्यानंदने कैलासा नावाचा देश वसवल्याची माहिती समोर आल्यापासून ही बातमी चर्चेत आहे. आता तो आपल्या कैलासा या देशात नागरिकता देत आहे.

कैलासाचे नागरिक बनण्यासाठी काय प्रक्रिया आहे हेही नित्यानंदने जाहीर केले आहे. व्हेरिफाइड सोशल मिडिया अकाऊंटवरुन नागरिकता घेण्यासाठी लोकांना आवाहन केले आहे.

तुम्ही हिंदू धर्माचे पालन करत असाल किंवा हिंदू विचारधारेला मानत असाल किंवा हिंदू विचारधारा मानणाऱ्या समुहाबरोबर जोडू इच्छित असाल तर तर तुम्ही मोफत कैलासाची इ-नागरिकता घेऊ शकता असे या आवाहनात म्हटले आहे.

कैलासाच्या ऑफीशिअल अकाऊंटवरुन नागरिकतेच्या संदर्भात अनेक ट्विट केले आहेत. नागरिकतेसाठी दिल्या गेलेल्या लिंकमध्ये नाव, पत्ता , व्यवसाय आणि फोन नंबर सारख्या पर्यायातून तुमची माहिती मागितली जात आहे.

कैलासाचे नागरिकत्व मिळू शकते असा दावा कैलासाच्या अकाऊंटवरुन केला जात आहे. मात्र कैलासाचे नागरिकत्व मिळाल्यावर कैलासावर कसे पोहचायचे याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

नित्यानंदने कैलासा का वसवले ?

नित्यानंदवर बलात्काराचा आरोप लागल्यानंतर तो भारत सोडून पळून गेला होता. त्यानंतर त्याने दक्षिण अमेरिकेत जमीन खरेदी करुन त्याला आपला देश म्हणून घोषित केले आहे. या देशाला कैलासा असे नाव दिले आहे. नित्यानंदने कैलासा हे हिंदूराष्ट्र असल्याचे घोषित केले आहे.

ज्या हिंदूना जगाच्या कोणत्याही भागात सतावले गेले असेल अशा हिंदूना या देशात सुरक्षा दिली जाते असे कैलासाच्या वेबसाइटवर म्हटले आहे. कैलासाचे स्वत:ची रिझर्व बॅंक, संविधान , चलन असल्याचा दावा केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT