Nirav Modi will commit suicide Dainik Gomantak
ग्लोबल

...तर नीरव मोदी आत्महत्या करेल

दैनिक गोमन्तक

भारतीय बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून फरार झालेला आरोपी नीरव मोदी(Nirav Modi) भारतात परत न येण्यासाठी विविध डावपेचांचा अवलंब करीत आहेत. नीरव मोदीने प्रत्यार्पणाचा आदेश कायम ठेवण्यासाठी लंडन उच्च न्यायालयात(London High Court ) अपील केले आहे.यावरील सुनावणीदरम्यान, त्यांचे वकील म्हणाले की जर त्याचे प्रत्यार्पण भारताकडे झाले तर त्याला शिक्षा सुनावून आर्थर रोड जेलमध्ये(Arthur Road Jail) ठेवले जाईल आणि या जेलमध्ये अनेक आरोपी असल्याने तिथे खूप जास्ती गर्दी आहे. आणि यामुळे मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावही अधिक आहे या भीतीमुळे नीरव मोदी आत्महत्या करण्याची शक्यता आहे असा दावा त्याच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) सुमारे 14,000 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी सध्या दक्षिण-पश्चिम लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहात बंद आहे. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला हजेरी लावली.

न्यायमूर्ती मार्टिन चेंबरलेन यांच्यासमोर सादर केलेल्या नव्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान नीरवच्या वकिलांनी पूर्ण न्यायालयीन सुनावणीची विनंती केली असून तो आत्महत्या करू शकतो म्हणून त्याच्या मानसिक अवस्थेच्या दृष्टीने प्रत्यर्पण योग्य ठरणार नाही.त्याला भारताला सुपूर्द ना करण्याची विनंतीही यावेळी त्याचा वकिलांनी केली आहे.

प्रत्यार्पणाविरूद्ध झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती चेंबरलेन यांनी आपला निर्णय राखून ठेवला. पुढील सुनावणीच्या वेळी, जिल्हा न्यायाधीश सॅम गोस यांनी पूर्वीच्या प्रत्यर्पणाच्या आदेशाविरूद्ध आणि एप्रिलमध्ये यूकेच्या गृहसचिव प्रिती पटेल यांनी मंजूर केलेल्या लंडनमधील उच्च न्यायालयात संपूर्ण सुनावणी आवश्यक आहे की नाही यावर न्यायालय निर्णय घेणार आहे.

नीरव मोदी एकेकाळी हिऱ्याचा सर्वात मोठा व्यापारी बनला होता, त्याने आपला व्यापार जगभरात सुरू केला होता पण बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात अली होती. या वर्षाच्या सुरूवातीस, लंडनच्या न्यायाधीशांनी नीरव मोदींचा युक्तिवाद फेटाळून लावला की जर त्यांना भारतात प्रत्यार्पण केले गेले तर त्यांना अन्यायकारक चाचणी घ्यावी लागेल. जरी त्यांचे सध्याचे अपील प्रयत्न अपयशी ठरले, तरीही नीरव मोदींकडे अजूनही यु.के. मध्ये राहण्याचे कायदेशीर पर्याय आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT