nigeria gasoline tanker exploded dainik gomantak
ग्लोबल

Nigeria: नायजेरियात पेट्रोलच्या टँकरचा स्फोट, 18 जणांचा मृत्यू; अनेक जखमी

Nigeria Gasoline Tanker Exploded: नायजेरियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण नायजेरियात पेट्रोल टँकरचा स्फोट होऊन 18 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले.

Manish Jadhav

नायजेरियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण नायजेरियात पेट्रोल टँकरचा स्फोट होऊन 18 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सने शनिवारी संध्याकाळी एका निवेदनात म्हटले की, आग्नेय राज्यातील एनुगुमधील एनुगु-ओनित्शा एक्सप्रेसवेवर पेट्रोल वाहून नेणाऱ्या एका टँकरने नियंत्रण गमावले आणि 17 वाहनांना धडक दिली.

मृतांची ओळख पटवणे कठीण

सुरक्षा दलाच्या बचाव पथकाचे प्रवक्ते ओलुसेगुन ओगुंगबेमिडे यांनी सांगितले की, 'मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. 10 जखमींव्यतिरिक्त, बचाव कर्मचाऱ्यांनी इतर तिघांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे.' नायजेरियातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर जीवघेणे ट्रक अपघात सामान्य आहेत. नायजेरिया हा आफ्रिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.

काही दिवसांपूर्वीही एक धमाका झाला होता

या (जानेवारी) महिन्याच्या सुरुवातीला उत्तर-मध्य नायजेरियातील नायजर राज्यातील सुलेजा परिसरात असाच एक स्फोट झाला होता. जिथे पेट्रोल टँकरच्या स्फोटात 98 लोकांचा मृत्यू झाला होता. एका टाकीतून दुसऱ्या टाकीत पेट्रोल भरत असताना हा स्फोट झाला होता. त्यावेळी पेट्रोल काढण्यासाठी अनेक कामगार आणि इतर लोक घटनास्थळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT