Boat  Dainik Gomantak
ग्लोबल

Boat Accident: बोटीचा दुर्देवी अपघात! 26 जणांचा मृत्यू

Boat Accident: बोटीचे वजन जास्त झाल्याने ही बोट बुडाल्याची अधिकाऱ्यांनी माहीती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Boat Accident: नायजेरियामध्ये मोकावा या ठिकाणी प्रवाशांसहित बोट बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, या बोटीमधील लहान मुले, महिला, पुरुष आपल्या शेताकडे काम करण्यासाठी निघाले होते. तेव्हा हा अपघात झाला आहे.

मृत्यू झालेल्यामध्ये जास्त संख्या ही महिला आणि लहान मुलांची होती. मात्र ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, या बोटीत १०० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. अजूनही बोटीतील इतरांचा शोध सुरु आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे, जुलै महिन्यातदेखील असाच बोटीचा अपघात झाला होता. त्यामध्ये १०० जणांनी आपला जीव गमावला होता. बोटीचे वजन जास्त झाल्याने ही बोट बुडाल्याची अधिकाऱ्यांनी माहीती दिली आहे.

दरम्यान, नायजेरियाचा हा भाग मागासलेला असून दुर्गम भागात आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, अयोग्य वाहतुकव्यवस्थेमुळे लोक नद्या पार करण्यासाठी बोटीचा वापर करतात. मात्र बोटी सुस्थितीत नसल्याने असे अपघात घडल्याचे दिसून येतात. आता अशाच कारणामुळे नायजेरियाच्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT