Mastercard Dainik Gomantak
ग्लोबल

Nexo अन् Mastercard ने लाँच केले जगातील पहिले 'क्रिप्टो क्रेडिट कार्ड'

जगातील पहिले क्रिप्टो क्रेडिट कार्ड (Crypto Credit Card) लॉन्च करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

जगातील पहिले क्रिप्टो क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यात आले आहे. क्रिप्टो प्लॅटफॉर्म Nexo ने जागतिक पेमेंट कंपनी मास्टरकार्डसोबत (Mastercard) भागीदारी केली आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मने संयुक्तपणे क्रिप्टो कार्ड लॉन्च केले आहे. हे जगातील पहिले क्रिप्टो पेमेंट कार्ड असल्याचे बोलले जात आहे. कंपनीच्या या हालचालीवरुन असे दिसून येते की, 'डिजिटल मालमत्ता (Digital Assets) आता हळूहळू मुख्य प्रवाहात पकड मजबूत करत आहे. या कारणास्तव, क्रिप्टो आर्थिक नेटवर्क आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.' (Nexo and Mastercard launch the first crypto credit card)

दरम्यान, सुरुवातीच्या टप्प्यात युरोपातील (Europa) काही देशांमध्ये हे कार्ड उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे नेक्सोने सांगितले आहे. कार्डद्वारे, यूजर्स त्यांची डिजिटल मालमत्ता जसे की, बिटकॉइन खरेदीसाठी वापरु शकतील, कारण ती मालमत्ता कर्जाची परतफेड करण्यासाठी म्हणून वापरता येईल. हे क्रिप्टो कार्ड तुम्ही कार्डमध्ये जमा केलेल्या डिजिटल मालमत्तेची हमी म्हणून धारण करेल. कार्डवर यूजर्स कोणताही खर्च न करता तसेच कोणत्याही प्रकारचे शुल्क न भरता डिजिटल मालमत्तेची खरेदी करु शकतो. कार्ड Nexo च्या क्रिप्टो बॅक्ड क्रेडिट लाइनशी लिंक केले जाईल. हे मास्टरकार्ड वैध असलेल्या जगभरातील 92 व्यापाऱ्यांसोबत वापरले जाऊ शकते. यामध्ये, गुंतवणूकदाराच्या क्रिप्टो मालमत्तेच्या फिएट मूल्याच्या 90 टक्के रक्कम खर्च केली जाईल.

तसेच, Nexo ने रॉयटर्सला सांगितले की, ''कार्डधारकाला कार्डसाठी कोणतेही मासिक पेमेंट द्यावे लागणार नाही. यासाठी मासिक पेमेंटही करावे लागणार नाही. त्याचबरोबर कार्ड न वापरल्यास कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत.''

शिवाय, ओपन क्रेडिट लाइनमधून ग्राहक किती खर्च करु शकतो किंवा किती पैसे काढू शकतो यावर कोणतीही मर्यादा नाही. प्रत्यक्षात वापरलेल्या क्रेडिटच्या रकमेवरच व्याज दिले जाईल. 20% किंवा त्यापेक्षा कमी कर्ज-ते-मूल्य गुणोत्तर राखणाऱ्या ग्राहकांसाठी, व्याज 0% वर राहील. मास्टरकार्डचे क्रिप्टो आणि ब्लॉकचेन उत्पादने आणि भागीदारीचे प्रमुख राज धमोधरन म्हणाले, "मास्टरकार्ड हे ओळखते की क्रिप्टो आर्थिक जगात क्रांती घडवणार आहे.''

याशिवाय, काही काळापासून मंदीचा सामना करणाऱ्या क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मार्केटमध्ये आता पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. जगभरातून क्रिप्टो एडॉप्शन घेण्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत, त्यामुळे नेक्सोची हे पाऊल फारसे आश्चर्यकारक वाटू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...म्हणून गोवा सोडलं', आयोजकांनी पहिल्यांदाच सांगितलं IBW हलवण्याचं कारण; नेमका गोंधळ काय?

रानडुक्कर समजून झाडलेली गोळी मित्राला लागली; सावंतवाडीच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

Opinion: भारताला उंच पुतळ्यांत नव्हे, तर एकेकाळी जगाला आपल्याकडे आदराने व कुतूहलाने पाहायला लावणाऱ्या गूढतेत शोधणे आवश्यक आहे..

Goa Live News: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाळीतून सुंदर नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल; कार्यकर्त्यांचे जबरदस्त शक्तीप्रदर्शन

Ind Vs SA: भारत आफ्रिका सामन्यापूर्वी मोठी बातमी! 2 खेळाडू दुखापतग्रस्त; 'वॉशिंग्टन'लाही डच्चू? पंत, तिलकवरती नजर

SCROLL FOR NEXT