Hana Rawhiti Maipi Clarke Dainik Gomantak
ग्लोबल

Video: ''मी तुमच्यासाठी जीव देईन'', न्यूझीलंडच्या सर्वात तरुण महिला खासदाराचं भाषण व्हायरल; जगाने घेतली दखल!

Manish Jadhav

Hana Rawhiti Maipi Clarke: न्यूझीलंडच्या 170 वर्षांच्या इतिहासात सर्वात तरुण खासदार बनलेल्या हाना रावहिती मापी क्लार्क हिचे संसदेत माओरी भाषेतील भाषण जगभरात चर्चेचा विषय बनले आहे. हानाचे हे भाषण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. असे सांगितले जात आहे की, हे भाषण डिसेंबर 2023 मध्ये दिले होते जे आता शेअर केले जात आहे. तिच्या भाषणात, 21 वर्षीय हाना म्हणाली की, मी तुमच्यासाठी जीव देईन... पण मी तुमच्यासाठी जिवंत राहीन. अनोख्या पद्धतीने दिलेले वचन आता जगभर पसंत केले जात आहे. हाना ही माओरी जातीची आहे, ती न्यूझीलंडच्या मूळ रहिवाशांपैकी एक आहे.

हाना म्हणाली की, 'मी संसदेबाहेर यापूर्वी दिलेले माझे भाषण माझ्या आजोबांना समर्पित करते. तथापि, मी आजचे भाषण माझ्या मुलांना समर्पित करते. न्यूझीलंडमधील एओटेरोआ येथून निवडून आलेली हाना 1853 नंतर पहिल्यांदाच सर्वात तरुण खासदार ठरली आहे. हाना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडच्या संसदेत निवडून आली. ननय्या माहुता यांचा पराभव करुन तिने ही निवडणूक जिंकली. 2008 पासून ननय्या या सीटवरुन निवडून येत होत्या. एवढेच नाही तर 1996 पासून ननय्या खासदार होत्या.

न्यूझीलंड हेराल्डच्या वृत्तानुसार, हाना न्यूझीलंडमधील मूळ रहिवाशांच्या हक्कांसाठी लढत आहे. हानाचे वडील तैतीमू हे मापी माओरी समुदायाचे आहेत आणि ते एनगा तामाटोआ गटाशी संबंधित आहेत. हाना न्यूझीलंडमधील ऑकलंड आणि हॅमिल्टन शहरांमध्‍ये वसलेले हंटले या लहान शहराची रहिवासी आहे. माओरी समाजातील मुलांसाठी ती इथे गार्डन चालवते. ती स्वतःला राजकारणी मानत नाही तर माओरी भाषेची संरक्षक मानते. ती म्हणते की, माओरींच्या नव्या पिढीलाही ऐकण्याची गरज आहे.

दरम्यान, हानाचे पूर्वज वायरमू काटेन हे 1872 मध्ये पहिले माओरी मंत्री झाले. हानाची मावशी हाना ते हेमारा यांनी 1972 मध्ये न्यूझीलंडच्या संसदेत माओरी भाषेत भाषण दिले होते. 2018 मध्ये, हानाचे आजोबा तैतीमू मापी यांनी कॅप्टन जॉन हॅमिल्टनचा पुतळा तोडून प्रसिद्धी मिळवली. त्यांनी हॅमिल्टनच्या वसाहतवादी वारशाचा विरोध केला होता. माओरी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधातही त्यांनी आवाज उठवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT