Stop Smoking Dainik Gomantak
ग्लोबल

'हा' देश नो स्मोकिंग झोन म्हणून घोषित?

14 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या तरुणांच्या सिगारेट खरेदीवर आजीवन बंदी घालण्यासाठी सरकार (Government) कायदा आणणार आहे.

दैनिक गोमन्तक

देशाचे भविष्य धुम्रपानाच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी न्यूझीलंडने (New Zealand) एक अनोखी योजना आणली आहे. 14 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या तरुणांच्या सिगारेट खरेदीवर आजीवन बंदी घालण्यासाठी सरकार कायदा आणणार आहे. या कायद्याची पुढील वर्षभरात अंमलबजावणी होऊ शकते. कायद्यानुसार सिगारेट खरेदी करण्याचे किमान वयही वर्षानुवर्षे वाढतच जाईल.

कायदा लागू झाल्यानंतर काय होईल ते जाणून घ्या

सरकारचा असा युक्तिवाद आहे की, कायद्याच्या अंमलबजावणीच्या 65 वर्षानंतर, दुकानदार 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच सिगारेट विकू शकतील. 2025 पर्यंत देशातील धूम्रपान करणाऱ्यांची संख्या पाच टक्क्यांनी कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सरकारने पुढे सांगितले की, धूम्रपान कमी करण्यासाठी इतर प्रयत्नांना खूप वेळ लागत आहे. तंबाखूच्या सर्व उत्पादनांमध्ये निकोटीनचे प्रमाण कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. देशात दरवर्षी पाच हजार लोकांचा धूम्रपानामुळे मृत्यू होतो.

तरुणांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे गुन्हा ठरेल

न्यूझीलंडच्या एसोसिएट आरोग्य मंत्री (Associate Minister of Health) आयशा वेरॉल (Ayesha Verrall) यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही हे सुनिश्चित करु इच्छितो की, तरुणांनी आपल्या आयुष्यात कधीही धूम्रपान करु नये. त्यामुळे आम्ही हा कायदा आणत आहोत. गेल्या दशकात धूम्रपानाचे प्रमाण घटले आहे. सध्या, न्यूझीलंड 18 वर्षाखालील लोकांना तंबाखूच्या विक्रीवर बंदी घालते.

दरम्यान, काहीही बदलले नाही, धुम्रपानाचे प्रमाण 5 टक्क्यांपर्यंत खाली येईपर्यंत अनेक दशके लागतील. सरकारी आकडेवारीनुसार, न्यूझीलंडमध्ये 15 वर्षांवरील 11.6 टक्के लोक धूम्रपान करतात. 2022 च्या अखेरीस कायदा बनवण्यासाठी सरकार पुढील वर्षी जूनमध्ये संसदेत कायदा सादर करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT