President of China  Dainik Gomantak
ग्लोबल

दक्षिण कोरियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष ठरणार चीनची डोकेदुखी

नवनिर्वाचित अध्यक्ष युन सुक-यिओल हे अमेरिकेचे समर्थक असल्याचे लोकांचे मत आहे.

दैनिक गोमन्तक

दक्षिण कोरियाच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांचे चीनने अभिनंदन केले आहे. मात्र हा निवडणूक निकाल चीनसाठी धक्कादायक असल्याची सर्वत्र चर्चा आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष युन सुक-यिओल हे अमेरिकेचे समर्थक असल्याचे लोकांचे मत आहे. आधीचे राष्ट्राध्यक्ष मूंग जे-इन यांनी अमेरिका आणि चीन यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला होता.

निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष युन यांनी म्हटले आहे की ते अमेरिका आणि जपानसोबत (Japan) दक्षिण कोरियाचे संबंध अधिक दृढ करतील. युन यांनी उत्तर कोरियाला त्यांची अण्वस्त्रे नष्ट करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे की, जर दक्षिण कोरियाने (South Korea) चीनविरोधात (China) कठोर भूमिका घेतली तर त्याचे गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात. अनेक विश्लेषक युन यांचे 'दक्षिण कोरियाचे ट्रम्प' असे वर्णन करतात. समाजात ध्रुवीकरण निर्माण करण्याच्या त्यांच्या रणनीतीमुळे देशातील अनेक लोक चिंतेत आहेत. दक्षिण कोरियातील अनेक वृत्तपत्रांनी आता युन यांना आवाहन केले आहे की त्यांनी प्रचाराची वृत्ती सोडून देशाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा. Chosun Aibo या वृत्तपत्राने लिहिले आहे - युनने विभाजित देशाला एकत्र आणण्याचा मार्ग अवलंबला तर ज्यांनी त्यांना मत दिले नाही ते देखील त्यांची प्रशंसा करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT